नागपूर समाचार : ओम मंडली शिवशक्ती अवतार सेवा संस्था रायपूर (छत्तीसगड) यांच्यावतीने नागपुरात लोक कल्याणासाठी रविवार, २८ जुलै रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत श्री गीता मंदिर, भागवत भवन कॉटन मार्केट येथे भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन केले असून ओम ध्वनीचा अचूक आणि शुद्ध उच्चार केल्यास मानसिक तणावातून आराम मिळतो. यशाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि राष्ट्रीय स्तरावर वंदे मातरम गाण्याने देशभक्ती आणि देशप्रेम वाढते. असे मत रायपूरहून आलेल्या ओम मंडळी सेवा संस्थेचे राष्ट्रीय प्रचारक द्वारकाभाई यांनी चिंतेश्वर मंदीर इतवारी येथे व्यक्त केले.
यावेळी नागपूर केंद्रप्रमुख गजाननभाई यांनी द्वारकाभाई व त्यांच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच सर्व भक्तांना ब्रह्म भोजनाची व्यवस्था केलेली आहे. डॉ. हरगोविंद मुरारका यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.