।भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम।
।।महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम।।
।।।परमात्मा एक।।।
परमात्मा एक : सर्व व्यवस्थित सुरु होते. दिवाळी संपून ८ दिवस झाले होते. काही कारणास्थव आम्ही लोन काढले कामासाठी पण ते काम पूर्ण झाले नसल्यामुळे पैसे कसे गुंतवायचे म्हणून माझ्या पतींना विचार आला. मग, माझ्या पतींची खुप दिवसाची फोरव्हिलर घ्यायची इच्छा होती तर, माझ्या पींनी दिवाळी मध्ये फोरव्हिलर घेतली. आम्ही मार्गदर्शकांना सांगितले तर त्यांनी सांगितले तसे आम्ही केले.
आम्ही सर्वांना पेठे दिले. त्यानंतर, परत काहीजण बाकी आहेत मनून आणखी पेढे आणायला लावले; पण माझे पती बाहेर गेले असल्यामुळे मी दुसऱ्या च्या हातानी आणखी पेढे बोलविले. काहींना दिले काही बाकी होते. गग त्या दिवशी रात्री ८ ते ९ वाजता माझ्या पतींनी गाडी काढली थोडे फिरून यायचे म्हणून, मग आम्ही फिरून आलो. घरी येताच माझ्या पतींचे सर मिळाले ते गाडी बद्दल बोलत होते. तर, मी पेढे आहेत काय करायचे म्हणून त्या सरांना दिले. तसेच, बाहेर आणखी ज्यांना बाकी होते त्यांना दिले. त्यावेळी मला हे कळले नाही की, सर दारू पिऊन होते. तसे, ते नेहमीच पिऊन असतात; पण मला तितके समजून आले नाही.
माझ्या पतीचे सरांसोबत बोलने झाले त्यांनतर आम्ही घरी येऊन जेवणाला सुरुवात केली, तसेच, त्याचवेळी माझ्या पर्तिच्या पोटात दुखायला लागले, तेव्हा माझे पती मला म्हणायला लागले, तु त्यांना पेढे दिली ते पेवून होते, मी म्हटले काय होते हो, घरी होते बाकी तर फेकन्यापेक्षा दिले. मग १० वाजले तरीही पोटात दुखने सुरुच होते. मी माझ्या पतींना म्हटले की, रुग्णालयात जाऊन तर माझे पती म्हणाले आता रात्रीचे १० वाजले उदया जाऊ पण त्रास काही कमी होईना. त्यानंतर ११ वाजले, मुले झोपले व माझ्या पतींना मी फुक मारून दिली. मनात बाबांना सांगितले यांना बरे वाटू द्या असे. मग, काही वेळाने हे पण झोपले; पण मला झोप येत नव्हती.
मी सहज यांना कस वाटते म्हणून विचारले. तर, काही वेळाने आणखी त्यांच्या उलट्या व संडास एकदम वाढल्या, त्यामुळे मी खुप घाबरली. काही वेळाने १२ वाजले कसे करू मुलांना ठेऊन कुठे नेऊ यांना, असा मला विचार येऊ लागला. मग, मी तुमच्या सरांना सांगते, तुम्ही त्यांच्या सोबत जा रुग्णालयात. तरीही माझे पती तयारच होईना. मला असे वाटत होते की, अपचन झाले असणार त्यांना; पण यांचा त्रास कमीच होत नव्हता. तर रात्री सव्वाबारा ला मी माझ्या मोबाईल वरून सोळुंके सरांना माझ्या पतींना न सांगता फोन केला ते सर आले. तर, १ वाजता साळुंके सरांनी मी ज्या पिलेल्या सरांना पेढा दिला होता त्याच सरांना फोन करून माझ्या पतींना दवाखान्यात आणायला सांगितले कारण ते आमच्या दुसऱ्या मजल्यावर राहत असल्यामुळे व साळुंके सर आमच्या घरी न येता थेट दवाखान्यात पोहोचले. तर, दवाखान्यात नेता बरोबर त्यांना बीपी वाढला असल्यामुळे अतिदक्षता (खउण) विभागात नेले.
मी घरी असल्यामुळे मला काही कल्पना नव्हती की, काय झाले माझ्या पतींना. मग, रात्री दीड वाजता मला सोळुंके सरांचा फोन आला ते म्हणाले तुम्ही झोपून जा घाबरण्याची गरज नाही पोटात बर वाटतं नव्हतं तर सलाईन लावली आहे. मी काळजी नाही घ्यावी म्हणून साळुंके सर माझ्या सोबत खोटे बोलले होते. मग, मी काही चूक झाली असेल तर बाबा ला मनात माफी मागितली. त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी दवाखान्या मधून फोन आला की, टिफीन पाठ्या व तेव्हा मला कळले की, माझे पती अतिदक्षता विभागात आहे व त्यांना बीपी कमी नाही होताय असे. त्यानंतर मला राहवत नव्हते.
मला त्यांना दवाखान्यात जाऊन भेटायची इच्छा होत होती. परंतु माझे दोन मुले माझ्या सोबत असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हती व तिथे माझ्या पतींनी पाहणी करण्यासाठी दोन व्यक्तींना त्यांच्या साळुंके सरांनी ठेवले होते. तर, दोघांकरीता दोनच पास असल्यामुळे मला तिथे प्रवेश नव्हता. तर, मी एका मुलाला शाळेत सोडून दिले व एका मुलाला घेऊन व पास मागून मी माझ्या पर्तीना बघायला गेली. तर, मग मला माझ्या पतींनी पुन्हा आठवून दिले की, आपल्या कडून चूक झाली आहे, आपण पीलेल्या सरांना पेढा दिला होता. तसेच मी ठरवले मार्गदर्शकांकडे आपली चूक सोडवावी आणि मी मार्गदर्शक काकाजी कडे जाऊन आपली चूक सोडवली. तर, चूक सोडवल्या माझ्या पतींना आराम वाटायला लागला.
माझ्या पतींना डॉक्टर म्हणाले की, ते जे एक गोडी देत होते ते नेहमी करिता खावी लागेल असे. तर यामुळे पण आम्ही घाबरलो मग माझ्या पतींना बाबांच्या कृपेने बीपी वाढल्याचे काहीच जाणवत नसल्यामुळे आम्ही दवाखान्या मधून सुट्टी घेण्यासाठी प्रयत्न करत होतो; पण तेथील डॉक्टर पाच दिवस पूर्ण व्हायचे असल्या मुळे ते माझ्या पतींना सुट्टी देत नव्हते. तर मग आम्ही कशी बशी सुट्टी मधितली व भंडारा मधील दवाखान्यात गेलो. तर, तेथील डॉक्टर नी असे स्पष्ट सांगितले की, माझे पती आता स्वस्थ आहेत व कोणतीही गोडी नेहमी करिता खाण्याची गरज नाही. मग आम्ही घरी वापस आलो आणि कार्य घेतले. आता काहीही त्रास नाही. अशा प्रकारे आमच्याकडून नकळत झालेल्या चुकीची व चुकीची क्षमा मागता च भगवंतांनी आम्हाला माफी दिली.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते.
नाव – भारती संजय मंदुरकर
पत्ता – रेल्वे कॉलोनी पंढरपूर
सर्व सेवक आणि सेविकांना नमस्कार