नागपूर समाचार : सीआरपीएफच्या 86 व्या स्थापना दिनानिमित्त ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल, नागपूर संकुल येथे शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला ग्रुप सेंटर नागपूरचे पोलिस उपमहानिरीक्षक अनिल कुमार, परिक्षेत्र नागपूरचे पोलिस उपमहानिरीक्षक पी.आर. जांभोळकर, संयुक्त रुग्णालय नागपूरचे पोलीस उपमहानिरीक्षक (वैद्यकीय) एम.के.सिन्हा, कमांडंट 213 (महिला) बटालियन सियाम होई सिंचाग मेहरा, डेप्युटी कमांडंट ग्रुप सेंटर नागपूर बी.एल. मीना आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय कावा अध्यक्षा पूनम गुप्ता व ग्रुप सेंटरच्या महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यासोबतच ग्रुप सेंटरमध्ये क्रीडा स्पर्धाही घेण्यात आली.