नागपूर समाचार :- दिनांक २७.०७.२०२४ रोजी ११.०० वा. नागपुर शहर दलातर्फे टेमारिन्ड हॉल, चिटणवीस सेंटर, सिव्हील लाईन, नागपूर येथे पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांचा ” फाईट अगेन्स्ट ड्रग्स” या विषयावर टॉल्क शो आयोजीत करण्यात आला होता.नमुद टॉल्क शो दरम्यान शहरातील विविध शाळा, कॉलेज व सेवाभावी संस्थेचे संचालक व पदाधिकारी सदस्य तसेच, विद्यार्थी आणि युवा वर्ग हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस आयुक्त यांनी उपस्थितांना संबोधीत करतांना, ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्स” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच, पोलीस आयुक्त यांनी सांगीतले की, ते पहील्यांदा अशा विषयावरील कार्यक्रमात सहभागी होत असून, त्यामध्ये जनता सुध्दा स्वतः मनोभावे सहभागी होत आहे, म्हणून त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
त्याचप्रमाणे शहरातील युवा वर्गात पोलीस हे स्वतः सहभागी होवुन ड्रग्स विरोधात जनजागृती करीत असुन, आपली सर्वांची जबाबदारी आहे की, भविष्यातील युवा पिढी ही सुरक्षीत ठेवुन त्यांची ऊर्जा ही सकारात्मक दिशेने समाज कल्याणाकरीता वापरली गेली पाहिजे व यासाठी आपण सर्व प्रयत्नशील असावे असे मा. पोलीस आयुक्त यांनी प्रतीपादन केले.
तसेच,पोलीस आयुक्त यांनी वाहतुक नियमांचे अनुसरण किती महत्वाचे असते? याविषयी वेगवेगळे ठिकाणी, कॉलेज, शाळा येथे शिबीर आयोजन सुरू असलेबाबत सांगुन, वाहतुक नियमांचे पालन करणेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन व आवाहन केले. तसेच, सायबर गुन्हे बाबत जनतेने जागरूक व सतर्क राहुन तंत्रज्ञान वापरावे याबाबतही मार्गदर्शन केले, तसेच, सायबर सेल, नागपुर शहर यांनी सायबर गुन्ह्यांचे बावत अनेक आरोपींचे अकाऊंट फिज करून तक्रारदार यांना त्यांची फसवणुकीची रक्कम परत केलेबाबत व सतत चांगल्या प्रकारे तांत्रीक पध्दतीने गुन्ह्याचा तपास करीत असलेबाबत सांगीतले.
तसेच, युवावर्गातील व्यसनाधिनते कडे लक्ष वेधुन त्याबाबत चोरून, लपुन-छपुन अंमली पदार्थाची विकी करणारे यांचेवर नागपुर शहर पोलीस सतत पाळत ठेवुन असुन, सतत रेड कार्यवाही करीत असलेबाबत सांगीतले, नागपुर शहर हे सतत जनतेच्या सुरक्षेकरीता सज्ज असुन, तुम्ही जनतेने एक पाऊल समोर येणे गरजेचे आहे, याकरीता लॉ ऑफ अट्रैक्शन चा दाखला पोलीस आयुक्तांनी दिला.
नमुद फाईट अगेन्स्ट ड्रग्स या विषयावर टॉल्क शो कार्यक्रमास मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग), अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), पोलीस उप आयुक्त परि क. १ ते ५ नागपूर शहर, सहा. पोलीस आयुक्त (सर्व) नागपूर शहर व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे उपस्थित होते. नमुद कार्यक्रमाचे सुत्रसंचालन है सोनाली नक्षिणे यांनी केले.