- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 93 प्रकरणांची नोंद

उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (01) रोजी शोध पथकाने 93 प्रकरणांची नोंद करून 55300 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 36 प्रकरणांची नोंद करून 14400 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली.

दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 15500 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली.

सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 17 प्रकरणांची नोंद करून 3400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 14000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. माऊली रेसिडंसी यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. रघुकुल कंट्रक्शन यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. अभय ट्रेडर्स यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन मे. विक्की किराणा शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. परमात्मा स्विट्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *