- Breaking News, आयोजन, नागपुर पुलिस, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निरोप समारंभ

विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर सा. यांच्या हस्ते नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निरोप समारंभ

नागपूर समाचार : दिनांक ३१/०७/२०२४ रोजी नागपूर (ग्रामीण), पोलीस दलातुन सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर (ग्रामीण) येथे निरोप देण्याकरीता आमंत्रित करण्यात आले.

यावेळी एका ‘निरोप समांरभाच्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त होणाऱ्या १) पोउपनि सुनिल अंवरते, सुरक्षा शाखा नागपूर ग्रामीण २) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय वारई पोस्टे कळमेश्वर ३) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पाण्डेय नेमणुक पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण ४) सहायक फौजदार विमलेश पाण्डेय जिल्हा विशेष शाखा नागपूर ग्रामीण ५) सहायक फौजदार राजेश पिचरीया मोटार परीवहन विभाग नाग्रा. ६) पोलीस हवालदार शंकर पाल, जिल्हा वाहतुक नागपूर ग्रामीण यांना विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवून निरोप देण्यात आला आहे.

तसेच सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी अंमलदारांना पुढील आयुष्य सुख समृध्दीचे व आरोग्य संपन्न राहावे अश्या शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस दलातील सेवानिवृत्त पर्यंतचा कालावधी हा यशस्वीरीत्या पार पाडला याबद्दल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची प्रशंसा केली.

या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर डॉ. दिलीप पाटील भुजबळ, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश धुमाळ, मा. उप पोलीस अधीक्षक (गृह) विजय माहुलकर व कार्यालयातील मानव संसाधन शाखा ना.ग्रा पोलीस निरीक्षक अजय मानकर, महिला अंमलदार मिरा केंद्र इतर अधिकारी व अंमलदार (स्टाफ) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *