चंद्रपुर समाचार : आज स्थानिक शासकीय विश्रामगृहात एका ऐतिहासिक राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री आनंद चकिनारपवार यांनी आम आदमी पक्षात औपचारिक प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे निकटचे सहकारी श्री कुनाल शेटे आणि 100 हून अधिक कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे आम आदमी पक्षाला मोठे बळ मिळाले आहे.
हा पक्ष प्रवेश सोहळा प्रदेश संघटन सचिव श्री भूषण ढाकुलकर यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष श्री मयूर राइकवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. श्री राइकवार यांनी या प्रवेशामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेला मिळणाऱ्या बळावर भर दिला. श्री राइकवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली जिल्ह्यात आम आदमी पक्षाचे मजबूत संघटन उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या सर्व घडामोडींचा निश्चितच फायदा आम आदमी पक्षाला होईल, असे चित्र दिसत आहे.
श्री आनंद चकिनारपवार यांनी आपल्या भाषणात आम आदमी पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल व धोरणांबद्दल असलेल्या आकर्षणाचा उल्लेख केला. त्यांनी पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेचे विशेष कौतुक केले आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी काम करण्याची आपली प्रतिज्ञा व्यक्त केली.
श्री कुनाल शेटे यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी पक्षाच्या स्थानिक विस्तारासाठी आपले योगदान देण्याची तयारी दर्शवली.
या कार्यक्रमामुळे आम आदमी पक्षाच्या स्थानिक संघटनेला मोठी बळकटी मिळाली असून, येत्या काळात पक्षाच्या कार्यक्रमांना अधिक गती येण्याची अपेक्षा आहे. श्री चकिनारपवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अनुभवाचा व लोकसंपर्काचा फायदा पक्षाला होणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला प्रदेश संगठन सचिव भूषण ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे, जिल्हा संगठन मंत्री शंकर सरदार अरोरा, जिल्हा सचिव राजकुमार नगराळे प्रशांत सिदूरकर, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महिला अध्यक्ष ऍड तबसूम शेख, जिल्हा उपाध्यक्ष सुरज शाह, शेतकरी जिल्हाध्यक्ष दिपक बेरशेट्टीवार, अपलासंख्याक अध्यक्ष जावेद शेख, संतोष दोरखंडे, मधुकर साखरकर, वाहतूक जिल्हा उपाध्यक्ष संगम सगोरे, जितेंद्र कुमार भाटिया सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.