नागपूर समाचार : दलितांच्या दुःखाला आदिवासी चे दुःख दडलेले आहे त्यांच्या समस्या म्हणजे आपल्या समस्या हे समजून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन नेते चरणदास गायकवाड यांनी केले ते आज आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त यशवंत स्टेडियम धंतोली येथील आंरिमोचा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार ज्योती द्विवेदी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संजिवनी चौधरी, ओबीसी नेते राजू पांजरे, पल्लवी मेश्राम होते.
याप्रसंगी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मामासाहेब मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल शर्मा यांनी केले कार्यक्रमात नामदेवराव निकोसे, राजु कांबळे, विराग वासनिक, संगिता वासनिक मुन कमलेश मेश्राम, कमलेश कोल्हटकर उपस्थित होते.