- Breaking News, Chif Reporter - Wasudeo Potbhare, आंदोलन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : दारू विक्री बंदीसाठी प्रविणजी दटके यांना निवेदन देण्यात आले

देशी दारूबंदी विरोधात आंदोलन सुरूच राहणार

नागपूर समाचार : नागपूरात विनापरवाना बनावट देशी दारू विक्री होत आहे. या अवैधरीत्या होणाऱ्या दारू विक्रीवर पोलिस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे हा व्यवसाय दिवसाढवळ्या सुरू आहे. यातून दारू विक्रेता व पोलिस प्रशासन यांचे संबंध असल्याचे उघड होत आहेत. दारू विक्रेत्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून गुन्हे नोंदवावे, यासाठी नागपूर येथील देशी दारू दुकान हटाओ संघर्ष समिती तर्फे विधान परिषदेचे आमदार श्री प्रविणजी दटके यांना निवेदन देण्यात आले.

नागपूर देशी दारूची चढ्या दराने विक्री होत आहे. या दारूमुळे मजूर, तरुण पिढीतील युवकही व्यसनाधीन बनत चालले आहेत. दारू पीत असल्याने घराघरांत सतत भांडणे व हाणामारीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ही दारू विक्री बंद करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. 

यावेळी देशी दारू दुकान हटाव समिती दारूबंदी चळवळीच्या प्रणेते भास्करजी पराते व अध्यक्षा संगीता निमजे व सचिव पुष्पा पाठराबे, कार्यकर्ते आणि वस्तीतील नागरिक निवेदन देते वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *