देशभक्तीपर गीतांनी दुमदुमूले सुरेश भट सभागृह
नागपूर समाचार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत सोमवारी (ता:१२) ‘एक शाम शहीदो के नाम’ या निःशुल्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे यांनी आपल्या शैलीत देशभक्तीपर गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांपुढे सादर केली. देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण सुरेश भट सभागृह दुमदुमूले, कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमामध्ये १०० कलावंतांनी विशेष सहभाग नोंदविला.
गायक निरंजन बोबडे आणि चमू यांनी विविध गाणी सादर केली. यात “जहां डाल-डाल पर, वतन पे जो फ़िदा, देखो वीर जवानो अपने, मेरे देश की धरती, हे राष्ट्रदेवतांचे, है प्रीत जहा की रीत सदा, जिंदगी मौत ना बन जाए, हे मेरे प्यारे वतन, मेरा रंग दे बसंती चोला, कर चले हम फिदा जानो तन साथियों, सुनो गौर से दुनिया वालो, ए मेरे वतन के लोगों, यह देश है वीर जवानो का, संदेसे आते है आदी गीत सादर केले.वंदे मातरम् नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमात गायक सर्वश्री निरंजन बोबडे, अश्पाक शेख संजय नारद, सचिन डोंगरे आणि ग्रुप, सुशील गाडेकर, अनिल गुल्हाने, गौरी शिंदे, पूजा टिकेकर, कीर्ती डोकरीमारे, सुरभी दडावे, राहुल घोडेराव यांनी आपल्या सुमधुर गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय समूह नृत्याचे देखील सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले.
“नन्ना मुन्ना राही हूं” ने वातावरणात उत्साह
एक शाम शहीदो के नाम या कार्यक्रमांतर्गत चिमुकल्यांनी नन्ना मुन्ना राही हुं हे उत्स्फूर्तदायी गीत सादर करीत वातावरणात उत्साह निर्माण केला. चिमुकल्या गायकांच्या हृदयस्पर्शी स्वरांनी रसिकांची मने जिंकली.