नागपूर समाचार : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवार १५ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण झाले. तसेच “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत तिरंगा कॉन्सर्ट ‘देखो वीर जवानो’ चे आयोजन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमांतर्गत “एक पेड माँ के नाम” अभियान अंतर्गत आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय आयुक्तांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.