नागपुर समाचार : प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ दि व्हीजीवली चॅलेंज, महाराष्ट्र, इंडिया. संस्थे तर्फे दि. 15/08/2024 रोजी दिव्यांगाची बंदे मातरम रैली आयोजित कख्यात आली. झिरो माईल चौक, वेरायटी चौक पासून ते संविधान चौक पर्यंत ही रैली काढण्यात आली.
सर्वप्रथम गांधीजींच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. रैली मध्ये वंदे मातरम, भारत माता की जय अश्या अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यांनंतर संविधान चौक आल्यावर त्या ठिकाणी छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
भाजपचे महामंत्री रामभाऊ यांच्या हस्ते मूर्तीला माल्यार्पण करण्यात आले. त्यांनी सर्व उपस्थित असलेल्या दिव्यांगांना मार्गदर्शन केले. नंतर PFVC सदस्या भारती यादव हिने देश भक्तीवर काव्य वाचन केले आणि भारती शेंडे यांनी देश भक्तीवर गित सादर केले.
तसेच अंधविघालयाचे माजी मुख्यधापक नरेंद्र नाकसांडे सर यांनी काव्यवाचन केले. भारत माते बद्दल काव्यवाचन केले. तसेच आपल्या संघटनेचे अध्यक्ष त्र्यंबक मोकासरे सर यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून धन्यवाद व कौतूक केले. असेच नवीन नवीन उपक्रम आपण यापुढे राबऊ आणि देशहीताचे काम करू तसेच संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सुनंदा पुरी मॅडम यांनी मनोज वैरागडे व त्यांच्या टीम चे मनापासून कौतूक केले व त्यांना धन्यवाद व आभार मानले. तसेच संयोजक समीतीचे सदस्य नयनलाल ऊके यांनी अल्पोहाराची व्यवस्था केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होव्यासाठी सर्वश्री सुनंदा पुरी मॅडम, मिनाक्षी बाराहाते, वैशाली खेडकर, सुनंदा मोकासरे, मनोज वैरागडे, ज्योती समुद्रवार या नयनलाल ऊके यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केली.