- Breaking News, उत्सव, नागपुर समाचार

नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते नागपूर ग्रामीण येथील 10 पोलीस अधिकारी व 02 पोलीस अंमलदार यांना विशेष सेवा पदक प्रदान

नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यादिनी उल्लेखनीय कामगिरीसाठी नागपूर ग्रामीण आस्थापनेवरील 10 पोलीस अधिकारी व 02 पोलीस अंमलदार यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले, सिव्हील लाईन येथील पोलीस भवन येथे झालेल्या ध्वजारोहण समारंभा दरम्यान पदक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाला नागपूर शहर येथील पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, विभागीय आयुक्त नागपूर विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, पोलीस सहआयुक्त अस्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अधिकारी उपस्थित होते.

यांमध्ये नागपूर ग्रामीण येथील 1) पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे पोस्टे कळमेश्वर, 2) पोनि अरविंदकुमार कतलाम नियंत्रण कक्ष नाग्रा. 3) सपोनि चेतनसिंह चौहाण पोस्टे जलालखेडा 4) पोलीस उपनिरीक्षक सचिन उरकुडे पोस्टे नियंत्रण कक्ष नाग्रा. 5) मपोउपनि संघमित्रा बांबोडे पोस्टे पारशिवनी 6) मपोउपनि आरती नरोटे पोस्टे खापरखेडा 7) पोउपनि रवि मनोहर वाचक शाखा नाग्रा. 8) पोउपनि धवल देशमुख पोस्टे कोंढाळी 9) पोउपनि जगदीश पालीवाल पोस्टे बोरी 10) सपोउपनि राजीव शिंदे पोस्टे बिनतारी संदेश विभाग नाग्रा 11) पोहवा बियंचा चंद्रकांत जारोंडे बिनतारी संदेश विभाग नाग्रा. 12) मसपोनि माधुरी गायकवाड नियंत्रण कक्ष नाग्रा. यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *