नागपूर समाचार : मातृभूमी सेवा फाउंडेशन मध्य नागपूर द्वारे आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून श्रावण मासानिमित्त आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त नागपूर मध्ये आयोजित मंगळागौर स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या मंगळागौर स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडली. दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृताताई फडणवीस आणि भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांचे हस्ते बक्षीस वितरण समारंभ दिमाखात पार पडला.
मध्य नागपुरात प्रथमच भव्य मंगळागौर स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते एकंदरीत महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने हा भव्य दिव्य सोहळ्यात ३ हजारहून अधिक महिलांनी सहभाग घेतला असून या स्पर्धेत एकूण सहभागी 39 मंडळापैकी 11 मंडळांना रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह, देऊन गौरविण्यात आले. कृतिका गावंडे यांना श्रावण क्वीन आणि पिंकी चांदेकर यांना उत्कृष्ट निवेदिका म्हणून मान्यवरांचे हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
या महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक- ११०००/ रेणुका सखी मंडळ, द्वितीय ७०००/ स्वानंदी मंडळ, तृतीय ५०००/. जाऊस किट्टी ग्रुप, चतुर्थ ४०००/ न्यू आदिशक्ती ग्रुप, पांचवा ३०००/ उर्जयिनी ग्रूप, सहावा २५००/ वर्षा पॅलेस, सातवा २१००/ मैत्री ग्रुप असून प्रणाली ग्रुप, कलागौरव ग्रुप, नादखुळा मंडळ, हरियोग साधना ग्रुप आदींना १०००/ प्रति उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दिव्याज फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.अमृताताई फडणवीस, भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष सौ.चित्राताई वाघ, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ. प्रगती ताई पाटील, भाजपा शहर महामंत्री सौ.अश्विनीताई जिचकार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सौ. वैशालीताई चोपडे, भाजपा महिला मोर्चा शहर महामंत्री सौ. सारिका ताई नांदुरकर ,श्रीमती निशाताई भोयर, सौ.प्रिती ताई राजदेरकर, शहर संपर्क मंत्री सौ निकिताताई पराये सर्व माजी नगरसेविका शहर मंडल वार्ड महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
स्पर्धेचे संयोजन डॉ श्रीरंग वराडपांडे, सौ श्वेता निकम भोसले, सौ रेखा निमजे , यांचे असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता कशिकर, रजनी जैन, करुणा गावंडे, संगीता नाईक, करुणा अत्राम, नीरजा पाटील, गीता पार्डीकर, माया ठवळी, मंजुषा मोहिते, वंदना डीवरे, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन –
मंगळागौर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुरस्कार प्रदान करताना अमृताताई फडणवीस आणि चित्राताई वाघ