- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : महावितरण कार्यालयात सद्भावना दिवस प्रतिज्ञा महावितरण कार्यालयात सद्भावना दिवस प्रतिज्ञा

नागपूर समाचार : भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महावितरण कार्यालयात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरण कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा दिली.

महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन येथे जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गाने सोडविण्याची प्रतिज्ञा मुख्य अभियंता यांनी उपस्थितांना दिली.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता सर्वश्री राजेश नाईक, मंगेश वैद्य, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रदिप सातपुते, कार्यकारी अभियंता समिर शेंद्रे, उप विधी अधिकरी सुनिल उपाध्ये, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *