भंडारा समाचार : महाराष्ट्र राज्य महा.एनजीओ फेडरेशन व लायन्स क्लब भंडारा ब्राससिटि, सुलभा बहुउद्देशीय शिक्षण संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त शासकिय अंध विद्यालय येथे गोमय रक्षासूत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात शाळेतील मुलींनी गाईच्या शेणापासून बनविलेल्या पर्यावरण पूरक राख्या शाळेतील मुलांना बांधल्या यावेळी गो शाळेतील गाईच्या शेणापासून बनविलेल्या राख्या महा.एनजीओ फेडरेशन यांच्या कडून मिळाल्या असून सदर राख्या ह्या पर्यावरण पूरक आहेत त्यामुळे प्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धन होईल असे सुलभा बहुउद्देशीय शिक्षण संस्था भंडारा च्या अध्यक्षा डॉ. सुलभा मेश्राम यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब भंडाराब्रास सिटि चे अध्यक्ष डाँ. बबन मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकिय अंध विद्यालयाचे अधिक्षक एस.एन.बारई, शिक्षक बागडे,ब्राससिटि सचिव मोगेश खोब्रागडे, कमलकांत साठवणे,एम. जे. एफ शेखर गभणे, नितीन कासेवाले व पदाधिकारी, लाँयन्स क्लब भंडारा ब्राससिटी चे सदस्य उपस्थित होते.
समता नगर फेज 2 येथिल प्रज्वल पँरामेडिकल इन्सिट्यूट चे विद्यार्थीनी साक्षी बान्ते, महाश्वरी कांबळे, कामिनी धुसे, रविना बोरसरे, अश्मिता सोनुले, गुंजन भारद्वाज, स्मिता चोपकर यांनी अंध विद्यार्थ्यांच्या हातावर विश्वास आणि अतूट बंधनाची डोर भावाच्या हातावर प्रेमाचे बंधन असलेली राखी बांधली.त्याऩतर बहिणीचे प्रेम यावर विद्यार्थी पाहुल बावनथडे यांने बंधुत्वाचे कर्तव्य, प्रत्येक पाऊलावर बहिणीच्या पाठीशी भाऊ कसा उभा राहतो. त्याबद्दल गीत सादर केले. तसेच विद्यार्थीना नोटबुक, भेट वस्तु व मिठाईचे वाटप करण्यात आले.
तसेच प्रेमाचा बंधन “रक्षासूत्र” बांधण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा डाँ. सुलभा मेश्राम हिने आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून आरती करत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
रक्षाबंधन कार्यक्रमा दरम्यान यशवंत सावरबांधे, विठ्ठल हटवार, अर्थव वानखेडे, धुर्व्र बारस्कर, अभय गहाणे, आकाश गेडाम, रविशंकर वाघाडे, अविनाश डोंगरवार, पियुष ठाकरे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी बंध प्रेमाचा, बंध विश्वासाचा रक्षाब़धन निमित्त गोमय रक्षासुत्र उपक्रम प्रमुख शेखर मु़ंदडा पुणे व आयोजक भंडारा ब्राससिटि अध्यक्ष डाँ. बबन मेश्राम यांचे अंध विद्यालयाचे वतीने आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन पुर्व प्रांतपाल डि.जी वांदिले, प्रथम व्हिडीजी भरत भलगट,ईश्वरलाल काबरा,आर. सी शोभना वांदिले, झेड.सी प्रा. सुमंत देशपांडे,यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले तर यशस्वितेकरीता इंदिरादेवी काबरा, कुमकुम वर्मा,मयूर खोब्रागडे, लता खोब्रागडे, अनिता साठवणे, रेस्ना गुप्ता, शावली वाडेकर, पुजा पडोळे, डाँ. करुणा नंदेश्वर, निशा कारेमोरे, प्रगती कासेवाले, सृष्टि शर्मा, अश्विनी गभने, अर्चना श्रिवास्तव, सरीता मदनकर,संगिता सुखानी,जयश्री बोरकर इत्यादींनी सहकार्य केले.