- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार, स्वास्थ 

नागपुर समाचार : एक रुपया दान, कॅन्सरमुक्त अभियानाचा समारोप शनिवारी

नागपुर समाचार : निराधारांचा आधार असलेल्या देवता लाईफ फाऊंडेशनचा एक रुपया दान, कॅन्सरमुक्त अभियानाचा समारोप कार्यक्रम शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता सीताराम भवन, ५ वा माळा, रामनगर चौक येथे होणार असून याप्रसंगी हैद्राबाद येथील अभिनेत्री व राजकीय नेत्या माधवी लता उपस्थित राहणार आहेत.

देवता लाईफ फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी व भारतीय महिला संघटनेच्या अध्यक्षा विलासिनी नायर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कॅन्सरमुक्त अभियानात एक रुपया दान करीत युवा पिढीने जुळावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी केले होते.

देवता लाईफ फाऊंडेशनच्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी सर्वोतोपरी मदत केली आहे. कॅन्सरग्रस्त मुले व त्यांच्या पालकांसाठी गोटाळपांजरी येथे सर्व सोईयुक्त असलेले केअर सेंटर बांधण्याची योजना आहे. याशिवाय कॅन्सरग्रस्त मुलांच्या पालकांसाठी स्वयंरोजगार सुरू करून त्यांना स्वावलंबी करणार असल्याची माहिती नीलिमा बावणे यांनी दिली आहे. समारोप कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विवेक जुगादे, कस्तुरी बावणे, सारिका पेंडसे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *