उत्कृष्ट लोकसभा राजदुत व आदर्श युवक पुरस्कार प्राप्त
गोंदिया समाचार : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील विद्यार्थी तथा राष्ट्रिय सेवा योजना चा विद्यापिठ पुरस्कार प्राप्त व युवा प्रबोधनकार म्हणून ख्याती प्राप्त निखिल बन्सोड या़ना नुकताच उत्कृष्ठ लोकसभा राजदूत व आदर्श युवा पुरस्काराने पालकमंत्री धर्मरावबाबा आत्रम यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
पोलिस मुख्यालय कारंजा,ज्ञगोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी श्री.प्रजित नायर, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री.मुरुगानंथम, पोलिस अधीक्षक श्री.गोरख भामरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डाँ. बबन मेश्राम यांच्या उपस्थितीत निखिल बन्सोड यास सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ चा उत्कृष्ट कॅम्पस ॲंबेसडर व जिल्हास्तरीय आदर्श युवक पुरस्काराने सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
निखिलची देवरी तालुक्यातील मुंडीपार येथिल झाडीपट्टी रत्न म्हणून ओळख आहे. निखिल हा विद्यार्थी जीवना बरोबरच समाजसेवेची वृत्ती घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य करत आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये न.मा.द. महाविद्यालयाचा कॅम्पस ॲंबेसडर म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली होती. त्याने पथनाट्य, व्याख्यान, कविता व सोशल मीडिया च्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाविद्यालयातील युवकांना सोबत घेवून जिल्ह्यात प्रामाणिक पणे कार्य केले.
निखिल शिक्षणाबरोबरच प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा पाईक असलेला निखिल. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, स्त्रीभ्रूणहत्या चळवळ , लोककला चळवळ लोकनाट्य कलावंत व आदिवासी विभागात संशोधन व कार्य करत असुन सोबतच संत महापुरुषांचे विचार समाजाच पोहचवण्याचे काम करत आहे व आदर्श समाज घडविण्यासाठी झटत आहे. त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कार्यांची दखल घेऊन त्यांची निवड करुन त्यास सन्मानित करण्यात आले.आतापर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
त्याच्या यशा बद्दल गोंदिया शिक्षण संस्था अध्यक्ष वर्षाताई पटेल, सचिव माजी आमदार राजेन्द्र जैन, संचालक निखिल जैन,न.मा.द. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन , माजी रासेयो जिल्हाप्रमुख डॉ. बबन मेश्राम , रासेयो विद्यापिठ संचालक सोपानदेव पिसे,बाबुराव मडावी विद्यालय देवरी, मनोहर भाई पटेल कला व कनिष्ठ महाविद्यालय देवरी, आईवडील,प्राध्यापक वर्ग,शिक्षक , मित्रमंडळी व रासेयो परिवारातील सदस्यांनी अभिनंदन केले.