- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : शहरातील वाहतूक मार्गात बदल; अधिसूचना जारी

नागपूर समाचार : 31 ऑगस्ट रोजी रेशिमबाग मैदानावर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या कार्यक्रमाला नागपूर शहर तसेच जिल्हयातून मोठ्या प्रमाणात महिला येण्याची शक्यता आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील तहसील, नगरपरिषद, नगरपंचायत येथून मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होणार आहेत नागपूर जिल्हयातील सर्व तहसील, नगरपालिका, नगर पंचायत तसेच नागपूर महानगरपालिका यांचे हद्‌दीतून अनेक बसेस रेशिमबाग मैदान येथे नागपूर शहरातील विविध मार्गाने येणार आहेत.

सर्व सामान्य जनतेच्या जिवितास धोका व गैरसोय होवू नये व रेशिमबाग मैदान परिसरात नागरीकाना कार्यक्रमात येण्यास अडचण होऊ नये, तसेच गर्दीमुळे एखादी अप्रिय घटना घडू नये म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यकमाचे कालावधीत सर्व वाहनांना प्रवेश बंदी व वाहने पार्किंग करीता मनाई घालण्यात आली आहे. वाहतूकीस अडथळा निर्माण होवू नये, वाहतूक सुरळीत राहावी, सर्वं सामान्य जनतेच्या जिवीताच धोका व गैरसोय होवू नये म्हणून वाहतुकीवर निर्बंध घालण्याकरीता वाहतूक पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सी.पी अँड बेरार ते आवारी चौक ते क्रीडा चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. क्रीडा चौक ते आवारी चौक ते सी.पी अँड बेरार कॉलेज पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रदेश बंदी राहील. अशोक चौक ते अप्सरा चौक ते भोला गणेश चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. भोला गणेश चौक ते अप्सरा चौक ते अशोक चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. अशोक चौक ते आवारी चौक ते सक्करदरा चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. सक्करदरा चौक ते आवारी चौक ते अशोक चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. केशवद्वार ते गजानन महाराज चौक तसेच गजानन महाराज चौक ते केशवद्वार पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील.

नमूद मनाई करण्यात आलेल्या मार्गावरील वाहतूक ही खालील मार्गाने वळती करण्यात येत आहे. सी.पी अँड बेरार कॉलेज कडून आवारी चौकाकडे येणारी वाहतूक ही राम कुलर चौक व झेंडा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर वळती करण्यात येत आहे. अशोक चौकाकडून भोला गणेश चौकाकडे जाणारी वाहतूक ही रामकुलर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर वळती करण्यात येत आहे. अशोक चौकाकडून सक्करदरा चौकाकडे जाणारी वाहतूक ही मेडिकल चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर वळती करण्यात येत आहे.

क्रिडा चौकाकडून अप्सरा चौकाकडे जाणारी वाहतूक ही तुकडोजी चौकाकडे आणि मेडीकल चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर गळती करण्यात येत आहे. सक्करदरा चौकाकडून अशोक चौकाकडे जाणारी वाहतूक ही छोटा ताजबाग चौक व तिरंगा चौक यामार्गावर वळती करण्यात येत आहे. भोलागणेश चौकाकडून अशोक चौकाकडे जाणारी वाहतूक ही झेंडा चौक महाल व सक्करदरा चौक या मार्गावर वळती करण्यात येत आहे.

सर्व वाहनचालक यांनी नमूद कार्यक्रमाचे दरम्यान आपले प्रवासाचे नियोजन करून, वर नमूद मार्ग वगळून इतर मार्गाचा वापर करावा. वर नमूद मार्गावर केवळ शासकीय वाहने, अॅम्बुलन्स, फायर ब्रिगेडची वाहने आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने नागपूर शहर आणि इतर जिल्ह्यातील महिलांना घेऊन येणाऱ्या बसेस व प्रशासकीय वाहन यांनाच प्रवेश देण्यात येईल. अधिसूचना 31 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *