- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : सरस्वती हायस्कूलमध्ये शिक्षक दिन व भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन उत्साहात साजरा

नागपूर समाचार : छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित सरस्वती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोखारा येथे शिक्षक दिन व भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ.लता वाघ मॅडम अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.सत्यवान मेश्राम सर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे , डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष स्थानावरून संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ. लता वाघ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आज आधुनिक काळात यशस्वी विद्यार्थी होण्याकरिता त्यांच्यावर शाळेचे संस्कार देखील तेवढेच महत्त्वाचे असतात मोबाईल पासून दूर करण्याचा प्रयत्न पालकांनी जेवढा करण्याची गरज आहे तेवढे शिक्षकांचे देखील कर्तव्य आहे व मोबाईलला दूर करून अभ्यासाला आपला मित्र करण्याचे आव्हान केले, तसेच भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे अभ्यासातील महत्त्व व मराठी भाषेतील त्यांचे कार्य आज अधिक समजून घेऊन शिकवण आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. 

प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर सत्यवान मेश्राम सर यांनी शिक्षण दिनाचे महत्त्व व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच स.शि.आरती वझे मॅडम यांनी शिक्षकांमध्ये कोणते गुण असायला पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आचरण देखील कसे असावे याबद्दल सांगितले. उप मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जांभूळकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सुप्रिया ठाकरे या विद्यार्थिनींनी आपल्या महाविद्यालयातून आपण कसे घडत आहोत व शिक्षकांचे महत्त्व आपल्या जीवनात काय असते याबद्दल सांगितले. 

विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनी शिक्षक म्हणून स्वयं शासनाचा कार्यक्रम केला. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता श्रुतिका सहारे, सुरज दूधपचारे, हिमांशू पवार, सानिका जुमडे, मनीषा सिंग, भावेश मेश्राम, अंशित तिवारी, आयूशी सूर्यवंशी अनुष्का साटणकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी गावंडे हिने तर आभार प्रदर्शन साक्षी मांडवकर हिने केले कार्यक्रमाला संपूर्ण विद्यार्थी व शिक्षक वृद्ध उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *