नागपुर समाचार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वात भारताची पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पहिले जात आहे. प्रगतीच्या या प्रवासात डिजिटल इकॉनॉमिचे अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभार्थ्यांना दिला जाणारा लाभ हा याच डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही मध्यस्थाविना सरळ त्याच्या खात्यात जमा होत आहे. जगाच्या तुलनेत आपण साध्य केलेल्या लक्षणीय प्रगतीकडे सर्व देश आश्चर्याने पाहात असल्याचे ते म्हणाले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे नवे प्रवेशद्वार खुले झाले आहे. यात अनेक संधी दडलेल्या आहेत. खेड्यापाड्यात हे तंत्रज्ञान आता रुजले असून आपल्याला आता कुशल मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
रामदेवबाबा सारख्या त्यागावर उभारलेल्या संस्थेतून येणारी विद्यार्थी हे देशाच्या प्रगतीला मोलाचा हातभार लावतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अभियांत्रिकेच्या तीन शेडमध्ये सुरू झालेल्या रामदेव बाबा महाविद्यालयाचा प्रवास हा येथील शिक्षकांनी विद्यापीठाच्या निर्मितीपर्यंत आणल्याचे भाऊक उद्गार माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काढले. येथील ३०० प्राध्यापक उच्च गुणवत्ताधारक असून २०० अध्यापक हे डॉक्टरेट असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या साध्या जीवनाची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी रामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात ‘एक पेड मन के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण केले. मान्यवरांच्या हस्ते रामदेवबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.