* धम्मदीक्षा स्टेजचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण
* सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि एन एम आरडी च्या आयुक्तांनी केली पाहणी
नागपूर समाचार : समाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या प्रमूख उपस्थितीत मंगळवार १७ सप्टेंबरला सकाळी दीक्षाभूमी परिसराची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाचे आयुक्त संजय मीना, भदंत ससाई उपस्थित होते. धम्मदीक्षा सोहळा २५ दिवसांवर आल्याने प्रस्ताविक अंडरग्राऊंड पार्किंगसाठी करण्यात आलेल्या खड्डा २२ सप्टेंबरपर्यंत बुझवून संपूर्ण जागा समतल करण्यात यावी, अशा सूचना वाघमारे यांनी एनएमआरडीला दिल्या.
प्रस्तावित अंडरग्राऊंड पार्किंगसाठी दीक्षाभूमी परिसरात सहा मीटर खोल खड्डा करण्यात आला होता. २० जुलै रोजी मुसळधार पावसाने आणि त्यानंतर सतत पाऊस पडल्याने येथील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचले होते. पाण्याचा उपसा करून जागा करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एनएमआरडीला लेखी निवेदन पाठविले होते.
राज्य शासनाने तत्काळ दखल घेत सात दिवसात पाण्याचा उपसा करून खड्डा बुझविण्याच्या कामाला युध्दपातळीवर सुरूवात केली. आता हे काम अंतिम आले आहे. मंगळवारी सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, एनएमआरडीचे आयुक्त संजय मीना यांनी तासभर पाहणी केली. तसेच धम्मदीक्षा सोहळ्यासाठी स्टेजचे बांधकामही ३० सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल, याबेताने युध्दपातळीवर काम करावे असे दीशानिर्देश यावेळी दिले. वेळ कमी असल्याने स्टेजवर स्लॅब (छत) पडणार नाही. परंतू स्टेजचे (चबुतरा) काम पूर्ण करण्यात याप्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत ससाई, नागपूर सुधार प्रन्यासचे अभियंता पंकज पाटील, भांडारकर, समाजिक न्याय विभागाचे प्रादेशीक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, दीक्षाभूमीचे सुरक्षा अधिकारी सिध्दार्थ म्हैसकर उपस्थित होते.
सप्टेंबर २५ पर्यंत जागा समतल
प्रस्ताविक अंडरग्राऊंड पार्किंगसाठी तयार करण्यात आलेला खड्डा बुझविण्याचे काम अंतिम आले आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता येत्या २५ संप्टेंबर पर्यंत संपूर्ण जागा समतल करण्यात येईल. तसेच धम्मदीक्षा सोहळ्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत स्टेजचे काम पूर्ण होईल. मात्र, छताचे काम नंतर करण्यात येईल.