- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : रामकृष्ण वाघ महाविद्यालय मुक्त विद्यापीठ बोखारा येथे विभागीय युवक महोत्सव 2024 चा उद्घाटन सोहळा उत्साहात साजरा 

विभागीय युवक महोत्सव 2024 चे अध्यक्ष श्री नारायण जी मेहरे सर, मुक्त विद्यापीठातील युवक महोत्सवातील स्पर्धेमुळे विद्यार्थी हा उत्तम नागरिक घडतो.

कलाभीव्यक्तीचे एक व्यापक व्यासपीठ म्हणजेच मुक्त विद्यापीठाचे युवक महोत्सव – विभागीय संचालक विभागीय केंद्र नागपूर श्री नारायण जी मेहरे

मुक्त विद्यापीठाचा युवक महोत्सव सोहळा म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण होय – उद्घाटक नाट्य कलाकार श्री संजय पेंडसे 

नागपूर समाचार : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नागपूर यांच्याद्वारे आयोजित युवक महोत्सव 2024 चा उद्घाटन सोहळा रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय बोखारा येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला विभागीय संचालक विभागीय केंद्र नागपूर डॉ नारायण जी मेहेरे सर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सत्यवान मेश्राम माजी प्राचार्य रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय महाविद्यालय बोखारा, उद्घाटक म्हणून नाट्य दिग्दर्शक अभिनेता निर्माता, नागपूर श्री संजय पेंडसे सर, विशेष उपस्थिती डॉक्टर संतोष पाठारे महाराष्ट्र शासनाच्या मराठी चित्रपट अनुदान समितीचे सदस्य, चित्रपट अभ्यासक, दिग्दर्शक संचालक थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव मुंबई, परीक्षक सौ, शिला रमेश बिडकर आकाशवाणी कलाकार, विविध नाटक, मराठी मालिका सिनेमात अभिनय, परीक्षक म्हणून लाभलेले श्री पार्थ विश्वास संचालक कला संगीत संस्कृती असोसिएशन, उमरेड महाविद्यालय प्राचार्य फुंडे सर, रामकृष्ण का कला वाणिज्य महाविद्यालय बोखाराचे प्राचार्य एम .वानखेडे सर , मुक्त विद्यापीठ संयोजिका आरती वझे मॅडम, सरस्वती कॉन्व्हेंट पाटणसावांगीच्या मुख्याध्यापिका सौ. ममता मिश्रा मॅडम उपस्थित होत्या.

पाहुण्याच्या हस्ते सरस्वती माता व मुक्त विद्यापीठाचे प्रणेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलित करून विभागीय युवक महोत्सवाचे औपचारिक रित्या उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन पर भाषण देताना दिग्दर्शक निर्माता श्री संजय पेंडसे सर यांनी विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी हा सांस्कृतिक स्पर्धेपुरता मर्यादित न राहता हा भविष्यात संभवणाऱ्या नोकरी संबंधित स्पर्धे करीता देखील तयार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.

 

विशेष उपस्थिती लाभलेले डॉक्टर संतोष पाठारे सर यांनी विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या व्यापक दृष्टिकोनाविषयी समजून सांगताना क्रीडा महोत्सव असो किंवा युवक महोत्सव या मध्ये सहभागी झाल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपला विकास घडवून आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

संचालिका सौ लता वाघ यांनी विद्यार्थ्यांना युवक महोत्सवा करीता शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना आपली भूमिका ही सकारात्मक ठेवून तशी तयार करावी अशी इच्छा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणामध्ये विभागीय संचालक विभागीय केंद्र नागपूर श्री नारायण जी मेहरे सर यांनी विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठा च्या युवक महोत्सवाचे व्यासपीठ म्हणजे कलागुणांना वाव देणारे एक व्यापक व्यासपीठ आहे व याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी उपयोग करावा व आपला सर्वांगीण विकास घडवून आणावा त्याचबरोबर विजयी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नागपूर विभागाचे नाव उंचवावे अशी इच्छा व्यक्त केली.

युवक महोत्सवामध्ये 28 स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सुगम गायन, समूहगीत भारतीय, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य सूचनात्मक नृत्य, प्रश्नमंजुषा वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, नकला, लघु नाटिका, स्थळ चित्रण, ललित कला विभाग, रांगोळी स्पर्धा, उत्स्फूर्त छायाचित्रकला, लघु चित्रपट इत्यादी यांचा समावेश करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन नागपूर विभागीय कर्मचारी संदीप मगर सर, संकेत रावडे सर, संभाजी मोरे सर, सुशील जिरवाडे सर रामकृष्ण वाघ मुक्त विद्यापीठाचे सर्व समंत्रक यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ सुवर्णा जांभूळकर तर आभार प्रदर्शन संयोजिका आरती वझे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *