दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा कार्यक्रम; जापानचे उपासक आज घेणार धम्मदीक्षा
नागपूर समाचार : पवित्र दीक्षाभूमीवर गुरूवारपासून धम्मदीक्षा सोहळ्याला सुरूवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत सकाळी ९.३० वाजता बुध्द वंदना घेण्यात आली. ससाई यांनी विविध राज्यातून आलेल्या उपासक उपासिकांना धम्मदीक्षा दिली. पहिल्याच दिवशी सातशेच्यावर उपासकांनी धम्मदीक्षा घेतली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीला महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती. त्यादिवसाची आठवण म्हणून भदंत ससाई दर वर्षी धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतात. १० १२ ऑक्टोबर पर्यंत सलग तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे. मंचकावर भदंत ससाई यांच्यासह भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते नागवंश, भंते महानागा, भंते धम्मप्रकाश, भंते धम्मविजय, भंते नागवंश एस., भंते भीमा बोधी, भंते अश्वजित, धम्मशीला उपस्थित होत्या.
सकाळपासून सुरू झालेल्या कार्यक्रमात सायंकाळपर्यंत जवळपास सातशेच्यावर उपासक उपासिकांनी धम्मदीक्षा घेतली. ससाई यांच्यासह प्रज्ञाबोधी व इतरही भंतेनी धम्मदीक्षा दिली. उपासकांनी त्रिशण व पंचशील ग्रहन केले तसेच त्यांना २२ प्रतिक्षा दिल्या. शुक्रवार ११ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता धम्मदीक्षेचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी जापानचे जवळपास ४० उपासक उपासिका धम्मदीक्षा घेतली. याशिवाय उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक आदी राज्यातील हजारो अनुयायी नागपूरच्या दिशेने निघाले आहेत. रात्रीपर्यंत पोहोचले. ते सुध्दा धम्मदीक्षा घेणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिक्खू संघ, समता सैनिक दल आणि धम्मसेनेचे पदाधिकारी रवी मेंढे, गणेश दुपारे, शितल चहांदे, अंकिता लोणारे, आरजू राउत, सेजल घोरपडे, फुलजित चिमणकर, नैना गणवीर आदींनी सहकार्य करीत आहेत.