नागपूर समाचार : छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित सरस्वती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोखारा, सरस्वती भवन कॉन्व्हेंट अँड हायस्कूल यांच्या विद्यमाने एक दिवा लेकी करिता हा नवरात्र निमित्त उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ. लता वाघ मॅडम त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉ. सत्यवान मेश्राम सर , तसेच प्रमुख उपस्थिती डॉ मोहिनी मेश्राम मॅडम, सरस्वती भवन कॉन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका सौ. चंचल चौबे मॅडम मुख्याध्यापक श्री विजय वनकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेची आरती करून अध्यक्षस्थानी असलेल्या संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ. लता वाघ मॅडम यांनी विद्यार्थिनींना स्वतःचे संरक्षण व स्वतःच्या पायावर उभे राहून देशाची जबाबदारी सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली. आज मुली या प्रत्येक क्षेत्रामध्ये पोहोचलेल्या आहे तरी देखील आधुनिक काळात होत असलेल्या विविध कारणांमुळे स्त्री ही स्वतःचे संरक्षण करू शकेल एवढी मजबूत होणे ही देखील काळाची गरज आहे असे सांगितले.
प्रमुख अतिथीं डॉ मोहिनी मेश्राम मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व आजच्या काळामध्ये विद्यार्थिनींच्या हिताकरिता येत असलेल्या सर्व योजनांचा फायदा घ्यावा त्याचबरोबर मुलींनी उच्चशिक्षित होऊन विविध पदभार सांभाळावे व देशाचा विकास घडवून आणावा अशी इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाला उपमुख्याध्यापिका डॉ सुवर्णा जांभुळकर, विभाग प्रमुख किशोरी काकडे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुनम वराडे मॅडम यांनी केले सूत्रसंचालन स. शि आरती श्रीवास मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन स. शि तुलशन अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.