- Breaking News, Chif Reporter - Wasudeo Potbhare, नागपुर समाचार

नागपुर समाचार : तीन दिवसात दहा हजार बांधवांनी घेतली धम्मदीक्षा

जपानच्या चाळीस अनुयायांचा समावेश

नागपूर समाचार : पवित्र दीक्षाभूमीवर गुरुवारपासून धम्मदीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली. १० ते १२ ऑक्टोबर या तीन दिवसात जवळपास दहा हजार बांधवांनी धम्मदीक्षा घेतली. यात जापानच्या चाळीस अनुयायांचा समावेश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती, दीक्षाभूमीच्या वतीने पवित्र दीक्षाभूमी येथे ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रमा दरम्यान गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे सलग तीन दिवस धम्मदीक्षा देण्यात आली. पहिल्या दिवशी धम्मदीक्षा घेणार्‍यांची संख्या फारच कमी होती. नंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी ही संख्या प्रचंड वाढली. या तीन दिवसात जवळपास दहा हजार बांधवांनी दिक्षा घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी बुद्धवंदनेनंतर विविध राज्यांतून आलेल्या उपासक, उपासिकांना धम्मदीक्षा दिली. उपासकांनी पंचशील ग्रहण केल्यानंतर २२ प्रतिज्ञांचे वाचन करण्यात आले. मंचावर भदंत ससाई यांच्यासह भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते नागवंश, भंते महानागा, भंते धम्मप्रकाश, धम्मविजय, भंते नागवंश एस., भंते भीमा बोधी, भंते अश्वजित, धम्मशीला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिक्खू संघ, धम्मसेनेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाच्या सैनिकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *