नागपूर समाचार : काल सायंकाळी 5.00 वाजता, सहाय्यक अभियंता महादुला/कोराडी, डीसी, महावितरणचे खवसे व ग्रामपंचायत घोगलीचे सरपंच राहुल सोनारे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत सामान्य निधी मधुन स्ट्रीट लाइट चा लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंचाने सांगीतले की, ग्राम पंचायत सामान्यनिधी -2024/25 मधुन स्ट्रीट लाइट, पोल, व स्ट्रीट लाइट फेजसाठी 7 लक्ष 31 हजार ईतकानिधी खर्ची घातला आहे,, महादूला आदर्श नगर पुलाचे पासून ते महानुभाव पंथाच्या आश्रम पर्यंत लाईट होते मात्र गावापर्यांत नसल्याने नागरिक, कास्तकारांना रात्रीच्यावेळी अंधारातून मार्ग काढावा लागत असायचे अनेकदा मासिक मिटिंग, ग्रामसभा मध्ये यावर साधक बाधक चर्चा होत असायची, नागरिकांच्या महत्वाचा कळीचा मुद्दा लक्षात घेवून आज स्ट्रीट लाइट चा लोकार्पण होत आहे याचे मनस्वी समाधान आहे सहाय्यक अभियंता खडसे यांनी डीपी वरून क ल दाबून लाईट सुरू केले.
या कार्यक्रमात संचालन दक्ष पत्रकार संघाचे मिलींद गाडेकर यांनी केले कार्यक्रमात सहायक अभियंता खडसे यांचा शाल व श्रीफळ देवून सरपंच राहुल सोनारे यांनी सत्कार केला, त्यांच्या समवेत लाईनमन गज्जु घासे सूरेश कमाले गहरूले हे देखील उपस्थित होते.याप्संगीग्रापंं उपसरपंच ओमप्रकाश भांगे, ग्रा, प सद्सया वर्षा घोरमाडे अर्पणा, गाडेकर, ग्रापं सदस्या गाडेकर, शिला बोलधने, माजी ग्रापं सदस्य नरेंद्र भांगे,, माजी सरपंच गूणवंता राऊत, धाकर भांगे, ग्रां निखील सोनारे, सुरेंद्र घोरमाडे, ध्यानेश्वर हरिणखेडे, नामदेव राऊत, संजय बावनकर, केमेकर, वडुले, रामभाऊ पटले, अरखैल, खाडे, प्रतिक्षा शेलारे, रागीणी गोंडाणे, वनीता कडबे, आदी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते तसेच अल्पोहार देवून कार्यक्रमाची सागता झाली.