गोंदिया तालुक्यातील चुलोद आणि टेंभणी येथे नवीन PHC तथा लोहारा, पिंडकेपार, कटंगीसह 7 गावांमध्ये आरोग्य उपकेंद्रांना मान्यता
गोंदिया समाचार : निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधी, जनतेच्या आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्र शासनाला केलेली वारंवार विशेष विनंती वर अखेर शासनाने, गोंदिया विधानसभा मतदारसंघाच्या 9 गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राला मान्यता दिली आहे.
शासनाने आमदार विनोद अग्रवाल यांची मांगणी वर “विशेष बाब” म्हणून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील 2 गावांसाठी 2 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 7 गावांसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे मंजूर केले आहे। आरोग्य केंद्र मंजूर झाल्यावर गोंदियाला उत्तम आरोग्य सुविधांची देणगी मिळाली आहे.
आज महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णय क्र. आस्थापना 2024/प्र. क्र. 196 अंतर्गत चुलोद आणि टेंभणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तथा प्र. क्र. 198/आरोग्य-3 अंतर्गत 7 गावांमध्ये 7 उपकेंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.
जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य केंद्रे आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जनताच्या आमदाराने आपल्या कर्तव्यपूर्ती जन आशीर्वाद यात्रेदरम्यान सांगितले होते. या आश्वासनाची पूर्तता करताना आज 9 गावांमध्ये आरोग्य केंद्रे आणून दिलेले शब्द पाळले.
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) मंजूर झालेल्या गावांमध्ये चुलोद आणि टेंभणी यांचा समावेश आहे. तर लोहारा, पिंडकेपार, चांदनीटोला, खलबंदा, फतेहपूर, कटंगी आणि खर्रा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहेत.
आमदार विनोद अग्रवाल यांनी आणलेल्या सर्व आरोग्य केंद्र उपकेंद्रांना त्यांनी वारंवार केलेल्या विनंती व पत्रव्यवहारामुळे ‘विशेष बाब’ म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य के केंद्रांना मान्यता दिल्याने आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले.