- Breaking News, नागपुर समाचार

रामटेक समाचार : एक पाऊल तरुणाईचे, भविष्य घडविण्याकडे – चंद्रपाल चौकसे

चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठाण आयोजित रोजगार महोत्सवात १८२४ जणांचे ऑन स्पॉट नियुक्ती पत्र

रामटेक समाचार : दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचा वादा करणाऱ्या मोदी सरकारच्या १० वर्षाच्या कार्यकाळात १४ कोटी जणांचा रोजगार हिसकावल्या गेला असून, रोजगारांना बेरोजगार करणाऱ्या या काळात बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी “एक पाऊल तरुणाईचे, भविष्य घडविण्याकडे..” या भूमिकेतून चंद्रपाल चौकसे यांनी आज रविवार २० आँक्टोबर रोजी शहरातील शांती मंगल कार्यालयच्या भव्य प्रांगणात चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान “रोजगार महोत्सव २०२४” व्यापक स्वरूपात आयोजन केले होते, यात रामटेक विधानसभा क्षेत्रातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींनी हजेरी लावून नोकरीचे निवेदन दिले. या महोत्सवाच्या माध्यमातून १८२४ बेरोजगार युवक व युवतीना “ऑन द स्पॉट” नियुक्ती पत्र देण्यात आले. आनंदाच्या भरात चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारताना तरुण-तरुणींनी चौकसेंचे यावेळी जाहीर आभार मानले.

रोजगार महोत्सवाला आज सकाळी दहाच्या सुमारास सुरुवात झाली. यावेळी मंचावर चंद्रपाल चौकसे , त्यांच्या अर्धांगिनी संध्या चौकसे , नाना उराडे , बळवंत पडोळे , रमेश ठाकरे आदी उपस्थित होते. स्वागत सत्काराच्या कार्यक्रमानंतर चंद्रपाल चौकसे यांनी उपस्थित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराचे महत्व पटवून देत विविध कंपन्यांच्या स्टॉलमध्ये जाऊन तथा बायोडेटा व लागणारी कागदपत्रे देऊन नोकरी मिळवण्याचे आवाहन केले. दरम्यान यावेळी महोत्सवात पन्नाशीच्या घरात नामांकित कंपन्यांचे अधिकारी बँकांचे अधिकारी तथा आयटीआय मधले अधिकारी बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी स्टॉल लावून उपस्थित होते.

शिस्तबद्ध पद्धतीने इंटरव्यू तथा सिलेक्शन प्रक्रिया पार पडली यावेळी बेरोजगार तरुण-तरुणींची मोठी रांग येथे लागलेली होती यांना सांभाळण्यासाठी मोठ्या संख्येत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. शिस्तबद्ध पद्धतीने रामटेक विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळावा असा या महोत्सवा मागचा हेतू असल्याचे चंद्रपाल चौकशी यांनी माहिती देताना सांगितले. सदर रोजगार महोत्सवात मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण-तरुणी हजेरी लावतील व त्यांना येथे संपूर्ण दिवसच लागेल या कारणास्तव येथे तरुण-तरुणींसाठी तथा त्यांच्या पालकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी साडेपाच च्या सुमारास सदर महोत्सव कार्यक्रम संपुष्टात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *