- Breaking News, नागपुर समाचार, विधानसभा चुनाव

कोराडी समाचार : लोकशाही टिकविण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे प्रत्येकाचे कर्तव्य

कोराडी समाचार : देशातील लोकशाही टिकविण्यासाठी मतदारांनी आपला अधिकार बजावणे आवश्यक असून, मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या लता वाघ यांनी केले. सरस्वती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोखारा, सरस्वती भवन कॉन्व्हेंट अँड हायस्कूल यांच्या संयुक्त वतीने मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करावे, त्याचबरोबर १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांनी प्रथमतः मतदान करणार असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आवर्जून मतदान करायला जावे, असे आवाहन केले.

मतदान जनजागृती करण्याकरिता घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धा, रॅली, पथनाट्य, मतदान शपथ याचे महत्त्व समजून मतदानाचा हक्क आपल्या शेजारच्यांना व आपल्या नातेवाईकांना समजून सांगावा, असे सांगितले. यावेळी कॉलेज अॅम्बेसेडर धनश्री भांडारकर, अंशित तिवारी यांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत आवाहन केले.

मुख्याध्यापक चंचल चौबे, मुख्याध्यापक विजय वनकर, उपमुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जांभुळकर, मतदान विभागप्रमुख माधुरी आचार्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *