रामटेक समाचार : दिनांक 29-10-2024 रोज मंगळवारला तहसील कार्यालय रामटेक येथे गोरगरिबांचे कैवारी, महिला सक्षमीकरणासाठी निशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणारे, रोजगार मेळावा आयोजित करुन हजारो तरुण-तरुणीना रोजगार देणारे, आजपर्यंत 1341 जोडप्यांचे निशुल्क सामूहिक विवाह लावून देणारे, वेळोवेळी गरिबांची आर्थिक मदत करणारे, समाजसेवक चंद्रपाल चौकसे (पर्यटक मित्र, संस्थापक रामधाम तीर्थ, मनसर) यांनी हजारो कार्यकर्ते व समर्थकांचा उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला.
त्यानिमित्त जाहीर सभा घेण्यात आली व नंतर शांती मंगल कार्यालय, बस स्टॅड, रामटेक ते तहसील कार्यालय रामटेक पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला माल्यार्पण करुन भव्य नामांकन रैली काढण्यात आली. रैलीत पदाधिकारी, कार्यकर्ता, समर्थक, तरुण युवक – युवती, महिलासह, रामटेक विधानसभेतील समस्त जनता जनार्दन आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला हक्काचा माणूस व “चंद्रपाल चौकसे, आयेंगे रोजगार दिलायेंगे” च्या नाऱ्याने सर्व शहर दुम-दुमून गेले.