- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर/कामठी समाचार : पाच ग्रामपंचायतींची एकत्र नगर पालिका करणार – चंद्रशेखर बावनकुळे

नागपुर/कामठी समाचार : कामठी आणि नागपूर या शहरादरम्यान असलेल्या खसाळा, मसाळा, कवठा, खैरी आणि भिलगाव या पाच ग्रामपंचायतींना एकत्र करून नवी नगर पालिका करण्याची गरज असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मौदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

गुरुवारी बावनकुळे यांनी कामठी तालुक्यातील बाबुळखेडा, तांदुळवाणी, चिचोली, खापा पाटण, लोणखैरी, बिना, वारेगाव, सुरादेवी, कवठा, म्हसाळा, भिलगाव, रनाळा आणि येरखेडा या गावांना दिवाळीनिमित्त भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. ग्रामस्थांशी चर्चा करीत गावाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. श्री बावनकुळे म्हणाले, पाच ग्रामपंचायतींना नगर पालिका बनविण्यासाठी संबंधित सरपंचांना प्रस्ताव मागविणार आहे. या निर्णयामुळे गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावून विकासाच्या संधी उपलब्ध होतील.

महायुती सरकार लडकी बहीण योजनेतून राज्यातील अडीच कोटी महिलांना दरवर्षी 18 हजार रुपये देत आहे. महायुतीचे सरकार आल्यास ही योजना सुरू राहणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे 65 हजार कोटी रुपयांचे वीज बिल माफ करून, 2 कोटी नागरिकांचे वीज बिल कमी करण्याची योजना जाहीर केली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे पुढील पाच वर्षांत वीज बिलाचा कोणतेही आर्थिक भार पडणार नाही.

बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत फक्त दोन तास पक्षाच्या कार्यासाठी देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, या दोन तासांमुळे राज्यातील १४ कोटी लोकांचे भले होईल. तुम्ही निवडणुकीपुरते चार घर सांभाळा, मी तुम्हाला पाच वर्षे सांभाळणार, असा विश्वास दिला. त्यांच्या या दौऱ्यात आ. टेकचंद सावरकर, अनिल निधान, सरपंच निलेश डफरे, उपसरपंच रवी कुहिटे, उमेश रडके, अरविंद खोपे, सविता जिचकार, रवी पारधी, रमेश चिकटे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *