कामठी समाचार : कामठी विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी कामठी शहर येथे दिवसभर विविध वस्त्यांमध्ये नागरिकांच्या भेटी देणार असून संवाद साधणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजेपासून ते विविध ठिकाणी दीपावली मिलन कार्यक्रमात हजेरी लावत शुभेच्छा देतील.
श्री बावनकुळे सोमवारी सकाळी ११ वाजेपासून कामठीच्या गोराबाजार परिसरातून भेटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. त्यानंतर जुना गोदाम, मॉल रोड, भाजी मंडी, कोलसाटाल, पिली हवेली चौक, फुटाना ओली, सराफा बाजार, ओली नंबर २, तिलक नगर, गोयल टॉकीज, जुनी ओली, ओकांरेश्वर मंदिर, यादव नगर, हमालपुरा या भागात नागरिकांशी संवाद साधतील. सायंकाळी ७.३० वा. शिवपंचायत मंदिर फुटाना ओली, रात्री ८.३० वा. एमटीडीसी हॉल, ड्रॅगन पॅलेस, रात्री ९.०० वा. कल्पतरू मैदान कल्पतरू कॉलनी, रात्री ९.३० वा. गोकुलधाम सोसायटी येथे दिवाली मिलन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
यावेळी आमदार टेकचंद सावरकर, अनिल निधान, अजय बोढारे, उमेश रडके, नरेश भोयर, मनीष वाजपेयी, अजय अग्रवाल, राज हाडोती, संजय कनोजीया, लाला खंडेलवाल यांच्यासह मोठ्या संख्यने भाजपा कार्यकर्ता उपस्थित राहतील.