आ. समीर कुणावार यांनी सोपविले नियुक्तीपत्र
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील कोरा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव झोलबाजी वैरागडे यांची भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे समुद्रपुर ग्रामीणच्या कोरा सर्कल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती समुद्रपुर भाजपा तालुका अध्यक्ष वामन चंदनखेडे यांनी केली आहे.
उपरोक्त नियुक्तीचे पत्र त्यांना विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे शुभहस्ते आज देण्यात आले.
आ. समीर कुणावार यांनी श्री. वैरागडे यांना पुढील कार्याकरीता अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
श्रीयुत वैरागडे हे समुद्रपूर तालुक्यातील प्रसिद्ध कार्यकर्ते असून त्यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे.
कार्यसम्राट आ. समीर कुणावार यांचे लोकाभिमुख कार्यप्रणाली तसेच विकासकामांमुळे प्रभावित होऊन भाजपात प्रवेश केला असल्याचे वैरागडे यांनी सांगीतले.