- Breaking News, नागपुर समाचार, विधानसभा चुनाव

कामठी समाचार : माविआच्या नऊ नेत्यांना मुख्यमंत्री पदाचे दिवास्वप्न – चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका

कामठी तालुक्यात दिवाळी मिलन व कार्यकर्त्यांशी संवाद

कामठी समाचार : विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करून आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्वप्न महाविकास आघाडीतील 9 नेते पाहत आहेत, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कामठी-मौदा मतदार संघातील भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यांचे हे स्वप्न मुंगेरीलाल के हसीन सपने असून ते केवळ दिवास्वप्न ठरतील, असाही टोला त्यांनी लगावला. 

मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी येरखेडा येथील नागरिकांद्वारे कुसुमताई संगेवार सभागृहात आयोजित दिवाळी मिलन सोहळ्यात ते बोलत होते. मंगळवारी श्री बावनकुळे यांनी कामठी तालुक्यातील येरखेडा नगरपंचायत क्षेत्र, होमथळा पंचायत समिती क्षेत्र, महालगाव पंचायत समिती क्षेत्र, वडोदा पंचायत समिती क्षेत्र, तरोडी पंचायत समिती क्षेत्र, बिडगाव नगरपंचायत क्षेत्रातील बिडगाव व तरोडी, शिरपूर व महादूला येथे विविध कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवार यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे सांगून त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसवर कडवट टीका केली. श्री बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने खोटे आश्वासन देऊन मतदारांना फसवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार आणि आरक्षण रद्द करणार असल्याचे भ्रामक प्रचार करून काँग्रेसने रामटेक मतदार संघात विजय मिळवला होता. परंतु, आगामी निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

काँग्रेसचे सुनील केदार यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, शेतकऱ्यांचे दीडशे कोटी रुपये हडप करणाऱ्या केदार यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. २२वर्षांपूर्वी झालेल्या या घोटाळ्यामुळे त्यांनी ५ वर्षांची शिक्षा भोगली असून, आता ते जामिनावर सुटले आहेत. असे असताना, काँग्रेसची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, जो माणूस स्वतः जामिनावर असताना तो या विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा जामीन घेत आहे, हे हास्यास्पद आहे.  

येरखेडा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही बावनकुळे म्हणाले. नगरपंचायत मिळाल्यास नागपूर शहरासारखा विकास या भागात निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची मंजुरी घेऊन, येरखेडा ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमाला आ. टेकचंद सावरकर, अनिल निधान, उमेश रडके, पंकज साबळे, देवेंद्र गवते, उन्मेष महल्ले, मंगला कारेमोरे, जया भस्मे, देवेंद्र गवते, मनीषा कारेमोरे, इश्वरचंद चौधरी, आशिष वंजारी, राजकिरण बर्वे, कुबेर महिल्ले, स्वप्नील शिवणकर, नरेश मोहाबे, मंगला करेमोर, जया भस्मे, मंदा महल्ले, राजश्री घिवले, शीतल चौधरी, रेणुका गुज्जेवर, सुनीता अगासे, राकेश खरोले, संदीप पोहेकर, राकेश काळे, मुकेश कानोजिय, रमन पाचे, राजेश पिपरेवर, सरिता भोयर, सुशांत काळे, पंकज साबळे, राजेंद्र बैस, राकेश मेटकर, शुभम वाडी भस्मे, गजानन तिरपुडे, राकेश भस्मे, वंदना बावणे, सुमेध दुपरे, अमोल घडले, प्रवीण भोंगाडे, कविता रायबोले, मो. तारिक भाई यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *