आरक्षित भूखंड नियमितीकरणासह आधुनिक वैद्यकीय सुविधा देण्याचा संकल्प
विकास ठाकरेंचा पश्चिम नागपुरचा विकासाचा वचननामा जाहिर
नागपूर समाचार : पश्चिम नागपुरातील सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी गेल्या 5 वर्षांत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम नागपुर सह शहरातील सर्व अनाधिकृत ले-आऊटस्, भूखंड आणि इमारतींवर आरक्षणाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या हक्काचे स्वप्न पूर्ण होत नाही आहे. प्रलंबित असलेल्या सर्व भूखंडावरील बांधकामे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचे आपले पहिले संकल्प आहे. याशिवाय प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मोफत देण्यासाठी आपण जिल्हा सामान्य रुग्णालय मानकापुरात लवकरच सुरू करण्यात येणार. याकरिता पश्चिम नागपुरच्या सर्वांगीण विकासाचा आणि जनतेच्या अपेक्षापूर्तीचा ‘वचननामा’ हा स्वप्नपूर्ती करणार. असे पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी वचननाम्यात व्यक्त केला. पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरे यांनी मंगळवारी आपला निवडणुकीचा वचननामा जाहिर केला. तसेच आज त्यांच्या जन आशिर्वाद यात्रेत या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले.
पश्चिम नागपुरसह शहरातील अनेक क्षेत्रात हजारो अनधिकृत ले-आऊटस्, भूखंड आणि इमारती आहेत. कांग्रेसच्या सरकारने 2001 ला गुठेंवारी कायद्या आणला होता. तसेच महाविकास आघाडी ने 2021 मध्ये गुंठेवारी 2.o हा नव्याने कायद्याला अमलात आणले. परंतु, काही भूखंड हे आरक्षणाच्या जोखाड्यात बंदीस्त असल्याने त्यांचे नियमितकरण झाले नाही. यामुळे अनेकांना आपले हक्काच्या घरापासून वंचित रहावे लागले. या सर्व प्रश्नांचे निराकारण करण्याच्या हेतूने विकास ठाकरे यांनी विशेष आरखडा तयार केला आहे. त्यात सर्व भूखंडाना एमआरटीपी कायद्याअंतर्गत आरक्षणाला रद्द करून भूखंडांचे नियमितीकरण करण्यात येणार. तसेच झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे. याशिवाय प्रत्येक प्रभागात आधुनिक वैद्यकीय सुविधा प्रत्येक नागरिकांना मिळावी याकरिता आपण विशेष आराखडा तयार केला आहे. यात योजनेंतर्गत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तयार केली जातील. जिथे ओपीडी, रक्त चाचण्या आणि इतर आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील. मानकापूर येथे बांधले जात असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू केले जाईल. तसेच हे रुग्णालय शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांशी जोडले जाईल. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया, रेडियोलॉजी, अंतर्गत रुग्ण विभाग, शवविच्छेदन केंद्र, रक्तपेढी आणि इतर सुविधांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल, असेही विकास ठाकरे म्हणाले.
नियोजनबद्ध आराखड्यातून सर्वांगिन विकास
गेल्या पाच वर्षांत पश्चिम नागपुरात केलेल्या कामांची पावती ही आपला विजय सुनिश्चित करणार. आपल्या विकासाच्या वचननाम्यात आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरकुल योजना राबविणार आहोत. या योजनेअंतर्गत सुरक्षित आणि सुसज्ज घरे उपलब्ध करून दिली जातील, याबाबत नियोजनबद्ध आपण आराखडा तयार केला आहे. तसेच मानकापूर, फ्रेंडस् कॉलनी, गोरेवाडा व दाभा येथील स्मशानभूमीचा पुनर्विकास होईल. मुस्लिम व बोहरा समुदायासाठी स्वतंत्र कब्रस्तान विकसित केले जातील. जुन्या जरीपटका आणि सिव्हिल लाइन्स येथे ख्रिश्चन सिमेंट्री आणि सेमिनरी हिल्स येथील पारसी सिमेंट्री येथे देखील अनेक कामे केली जातील. नागरिकांना सोलर सिस्टमशी संबंधित सर्व योजना/सब्सिडी उपलब्ध करून दिल्या जातील. शहरात पाण्याची समस्यांना सोडविण्याकरिता विद्यमान पाईपलाईनची क्षमता वाढवली जाईल आणि जुन्या पाईपलाईन बदलवून नवीन पाईपलाईन टाकली जाईल. सर्व चेंबर्सवर कव्हर लावले जातील. रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाची कामे गतीने पूर्ण केली जातील. सर्व प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण केले जाईल. तसेच योग्य स्ट्रीट लाईट्सची सोय केली जाईल.
याशिवाय प्रत्येक प्रभागात खेळाची मैदाने आणि उद्याने विकसित केल्या जातील ज्यात योग्य वॉकिंग ट्रॅक, योग शेड, ग्रीन जिम, पिण्याच्या पाण्याची सोय, सामुदायिक हॉल, सार्वजनिक शौचालये, स्टोअर रूम आदिची काम करण्यास प्राधान्य देण्यात येणार. विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे प्रलंबित क्रीडा सुविधांना पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार विकसित केल्या जातील. प्रत्येक प्रभागात एक इनडोअर क्रीडा स्टेडियम विकसित केले जाईल. पश्चिम नागपुरातील प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत आपण कटिबद्ध असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले.
जन-आशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेची सुरुवात मंगळवारपासून गिट्टीखदान येथील हनुमान मंदिरातून झाली. सकाळी आठ वाजता भगवान हनुमानाचे दर्शन करून प्रारंभ झालेल्या जन-आशीर्वाद यात्रा पुढे गिट्टीखदान बौद्ध विहार येथे जाऊन तथागत बुद्ध आणि परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून त्यांना अभिवादन केले.
यानंतर पुढे आयबीएम रोड मार्गाने जन-आशीर्वाद यात्रा बडी मस्जिद परिसर, गवळीपुरा, धम्म नगर, न्यू ताज नगर, कृष्णा नगर, आजाद नगर, वैष्णव माता मंदिर, छोटी मस्जिद, शारदा माता मंदिर लायब्ररी, बेंजामिन चॉल, निर्मल गंगा परिसर मार्गाने गिट्टीखदान शेवटचा बसस्टॉप येथे यात्रेचे समापन झाले. यावेळी महिला, पुरुष, तरुण भर उन्हात विकास ठाकरे यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे असताना दिसून आले. यावेळी कुणी रांगोळी काढली तर कुणी पुष्पवर्षाव करत त्यांचे स्वागत केले. काही ठिकाणी भगिनींनी स्वागताचे औषण करीत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. विकासाच्या मुद्दाला सर्वोतपरी घेऊन पश्चिम नागपुरात केलेल्या कामांची पोचपावती जन-आशिर्वाद यात्रेतून पाहयला मिळाली. तर सायंकाळी पाचच्या दरम्यान जन-आशीर्वाद यात्रेच्या दुसरा टप्पा मकरधोकडा हनुमान मंदीरापासून करण्यात आली.
भव्य असलेली रैली पुढे जगदीश नगर मार्गाने गंगानगर, आकार नगर, कोलबा स्वामी, फाळके ले-आऊट, नर्मदा कॉलोनी, म्हाडा कॉलोनी होत फ्रेंड्स कॉलोनी येथे यात्रेचे समापन झाले. जन आशिर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांनी जाहिर केलेल्या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. नागिरकांचा उत्स्फूर्त प्रतिसादातून त्यांनी ठाकरे यांना पुन्हा विजय निश्चित असल्याचे यावेळी दाखवून दिले. जन-आशीर्वाद यात्रेत महाविकास आघाडीमधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी स्वंयफूर्तीने यात्रेचे जागोजागी जल्लोषात स्वागत करुन विकास ठाकरे यांना विजयाचा आशिर्वाद दिला.