- Breaking News, नागपुर समाचार, विधानसभा चुनाव

नागपूर समाचार : प्रविण दटके च्या रूपाने एक कर्मठ कार्यतत्पर आमदार मिळणार – नितीन गडकरींचे यांचे प्रतिपादन

नागपूर समाचार : जे स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाहीत ते जातीपातीचे राजकारण करतात. भाजपने दहा वर्षात जात-पात बाजूला ठेवून शहरातील लोकांच्या समस्या सोडवल्या. जनसेवेचे, विकासाचे राजकारण केले. रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी काम केले. जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नाही. ते आम्ही अवघ्या एका दशकात करून दाखवले. काँग्रेसकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे तुमच्या घरी मत मागायला येणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना साठ वर्षांचा हिशेब मागा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवार ४ नोव्हेंबर रोजी मतदारांना केले.

नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य नागपूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या मध्य नागपूर विधानसभेच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन लाकडीपूल आगलावे चौक नागपूर येथे झाले. आमदार प्रवीण दटके यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली. यावेळी त्यांनी शहरातील विकास कामांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘नागपूर शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली. आज ७५ टक्के नागपूरकरांना बारा ते चोवीस तास पाणी मिळत आहे. मध्य नागपुरातील अनधिकृत वस्त्यांमध्ये चांगले रस्ते झाले.

जलकुंभ तयार झाले आहेत. मेट्रो रेल्वे आली, काँक्रिटचे रस्ते झाले, झोपडवासियांना मालकी हक्काचे वाटप झाले, मध्य नागपुरात उड्डाणपूल, अंडरपास झालेत. आता नाग नदीच्या प्रकल्पात शहरातील ड्रेनेज सिस्टीम सुधारण्याचेही काम होणार आहे. याचा फायदा मध्य नागपुरातील नागरिकांना जास्त होणार आहे, नाले शुद्ध होतील आणि ड्रेनेजमध्ये पाणी अडकणार नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले. धडाडीचे नेते म्हणून प्रवीण दटके यांची चांगली ओळख आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे,आमदार विकास कुंभारे, माजी खासदार विकास महात्मे,भाजपा अध्यक्ष बंटी कुकडे, गिरीश व्यास, यशवंत बाजीराव, दयाशंकर तिवारी, प्रशांत पवार, अर्चना डेहनकर, सूरज गोजे,श्रीकांत आगलावे, गिरीश देशमुख, विनायक डेहनकर, बंडु राऊत, विष्णू चांगदे, बादल राऊत, कविता इंगळे, अनिल अहिरकर, रामभाऊ आंबुलकर, भास्कर पराते, दीपक देवघरे कामिल अन्सारी, राजेश रोकडे, दीपराज पारडीकर, सुभाष पारधी, अब्दुल कदीर, मोसिन खान, छोटा फारुक, राजेंद्र नंदनकर, तसेच सर्व माजी नगरसेवक, नगर पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, संयोजक, वार्ड अध्यक्ष, कार्यकर्ते व मध्य नागपूर मतदार संघातील मतदार बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *