इतर 19 उमेदवारही रिंगणात
नागपूर/कामठी समाचार : आगामी विधानसभा निवडणुकीच्या लढतीत कामठी मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. याठिकाणी मुख्य लढत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते सुरेश भोयर यांच्यात होणार आहे. यासोबतच 19 उमेदवार या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
कामठी मतदारसंघात बावनकुळे यांची पकड मजबूत
चंद्रशेखर बावनकुळे यापूर्वी या जागेवरून आमदार राहिले आहेत. मतदारसंघात त्यांची चांगलीच पकड आहे. मतदारसंघातील लोकांशी असलेला त्यांचा संबंध आणि पालकमंत्री असताना केलेली कामे यामुळे आगामी निवडणुकीत ते विजयी होण्यासाठी प्रबळ उमेदवार बनतात.