- Breaking News, नागपुर समाचार, राजनीति, विधानसभा चुनाव

नागपूर समाचार : पूर्व नागपुरात होणार चौरंगी लढत, कृष्णा खोपडे, दुनेश्वर पेठे, हजारें सह आभा पांडे देणार टक्कर

नागपूर समाचार : विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांची मनधरणी करण्याच्या यशापयाशानंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले.पूर्व नागपुरात यंदा चौरंगी लढत लढत पाहायला मिळणार आहे.

भाजपची ताकद असलेल्या या मतदारसंघात विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांची बाजू सध्या वरचढ दिसत असली तरी मविआत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेलेल्या या जागेवरून पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे समोर आहेत. गेल्या वेळी 80 हजार मतदान घेणारे व काँग्रेसकडून बंडखोरी करणारे माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे व ज्येष्ठ माजी नगरसेविका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आभा पांडेही या लढतीला चौरंगीच्या दिशेने घेऊन गेले आहेत.

तर दुसरीकडे पूर्व नागपुरात तानाजी वनवे, संगीता तलमले यांनी माघार घेतल्याने भाजपचे कृष्णा खोपडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) दुनेश्वर पेठे यांना थोडा दिलासा मिळाला आहे. समाजाची आणि आघाडीची मतविभाजन टळल्याचा लाभ कुणाला होता, याचा अंदाज घेतला जात आहे. मात्र, पुरुषोत्तम हजारे यांनी पेठे यांची चिंता वाढवले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अप) आभा पांडे यांचा कुणाला फटका बसतो, याचा अंदाज घेतला जात आहे.

भाजपचे कृष्णा खोपडे यांनी केला निवडणूक जिंकण्याचा दावा 

पूर्व नागपुरातून विधानसभा निवडणुकीचे तिकीट जाहीर होताच भाजप नेते कृष्णा खोपडे यांनी निवडणूक जिंकण्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *