- Breaking News, नागपुर समाचार, राजनीति, विदर्भ, विधानसभा चुनाव

वर्धा/समुद्रपूर समाचार : समीर कुणावार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला नितीनजी गडकरी यांनी संबोधित केले

वर्धा/समुद्रपूर समाचार : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार श्री. समीर कुणावार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला नितीनजी गडकरी यांनी आज संबोधित केले.

समीर कुणावार यांच्या नेतृत्वात मागील १० वर्षांत हिंगणघाट मतदारसंघात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, आणि आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय विकास झाला आहे. समुद्रपूरच्या जनतेने सर्वच क्षेत्रांत या विकासाचा अनुभव घेतला आहे. विकासाची ओढ असलेल्या इथल्या जनतेने यावेळीही बहुमताने भाजप-महायुतीला विजयी करेल, असा विश्वास नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी, रीपाई(आ) नेते श्री.विजयभाऊ आगलावे, माजी खासदार वर्धा श्री.रामदासजी तडस, प्रदेश उपाध्यक्ष रा.काँ. पार्टी(अ.प.) मा.श्री.दिवाकरजी गमे सर, नगराध्यक्ष हिं. श्री. प्रेमजी बसंतानी, व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री.समीरभाऊ कुणावार यांचा भारतीय जनता पार्टी,शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.) रिपाई(आ) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच असंख्य नागरिकांनी या विराट सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *