- Breaking News, नागपुर समाचार, राजनीति

नागपूर समाचार : मनसे नागपूर माजी शहर अध्यक्षांचा भाजपात प्रवेश

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

नागपूर समाचार : दक्षिण – पश्चिम विधानसभा क्षेत्र, नागपूर येथील भाजपच्या जाहीर सभेत मनसेत १७ वर्षापासून कार्यरत असलेले माजी शहर अध्यक्ष अजय ढोके व त्यांचे अनेक सहकारी यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश केला.

दक्षिण – पश्चिम मतदारसंघात बारासिग्नल टिंबर मार्केट येथे आयोजित जाहीर सभेत शहरातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत श्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून अजय ढोके व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले.

याप्रसंगी श्री देवेंद्र फडणवीस  येत्या निवडणुकीत विजयाचा षटकार विक्रमी मतांनी नोंदवून पुनश्च जनतेच्या मनातील सरकार स्थापन करतील यात दुमत नसून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश बलशाली राष्ट्र म्हणून उभरले आहे तर श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाची घोडदोड अग्रक्रमी आहे हे सत्य जनतेने स्वीकारले असल्यामुळे महाविकास आघाडीने कितीही खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरीही महाराष्ट्रातील जनता त्यांना निवडणुकीत पराभूत करून महायुतीची सत्ता परत स्थापन करेल असा विश्वास अजय ढोके यांनी व्यक्त करीत सर्व भाजपा नेते मंडळी व उपस्थित जनतेचे आभार मानले.

मनसेचे अजय ढोके यांचेसह सर्वश्री उदय आक्केवार, प्रशांत वैद्य, श्रीधर विश्वनाथन, अनिल भावे, शैलेश तिजारे, दीपक वानखेडे, प्रविण बावणे, कपिल सोनोवणे, हरीश धवराळ, सुरेश काळबांडे, प्रणय दुरुगकर, निकेश भोले, अमर काळे, आकाश मोहंती, प्रशांत कौराते, शाम मेंढे, विशाल इंगळे, अक्षय दहीकर, प्रशांत भोंगाडे , आशिष रामटेके, मंगेश गजभिये, राजेश राजपूत, सुमित मसराम, प्रितम खोब्रागडे, विक्रम परमार, आकाश खापने, प्रमोद चिकणकर, ज्ञानेश्वर धोपटे, अतुल मसराम, प्रशांत वंजारी, अनिल तिवारी, भूषण पात्रे, खुशाल सहारे, विनय शेळके, योगेश्वर बनसोड, रामभाऊ पाटील, आनंद सलामे, पंकज पाटील, सोनू दांडेकर, पंकज जामगडे, कर्मण्य पवार इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *