नागपूर समाचार : आपल्या देशाची ओळख धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जगात केली जाते. कारण देशात संविधानानुसार देश चालतो. लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती मतदानातून आपला प्रतिनिधी निवडून आणतो. असाचा आपला पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्र आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शिख, ईसाई, पारशीसह इतर धर्मीय व समाजाचे मतदार आहेत. गेल्या पाच वर्षात पश्चिम नागपुरातील सर्व धर्मीय रहिवाशींयाच्या ऐकोपा मला कामाची स्फूर्ती देत आपण विकास कामे प्रगती करीत आहो. असा विश्वास प्रसिद्धी पत्रका द्वारे पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.
जन-आशीर्वाद यात्रेत मंगळवारी गरीब नवाज नगर मस्जिद जवळ एका छोटेखानी सभेत विकास ठाकरे म्हणाले की, आपण पश्चिम नागपुरातील प्रत्येक समाजाच्या बांधवांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेन,असा शब्द दिला. मानकापूर, फ्रेंडस् कॉलनी, गोरेवाडा व दाभा येथील स्मशानभूमीचा पुनर्विकास होईल. मुस्लिम व बोहरा समुदायासाठी स्वतंत्र कब्रस्तान विकसित केले जातील. जुन्या जरीपटका आणि सिव्हिल लाइन्स येथे ख्रिश्चन सिमेंट्री आणि सेमिनरी हिल्स येथील पारसी सिमेंट्री येथे देखील अनेक कामे केली जातील. येथील सर्व समाजात एकोपा जपण्यासाठी नेहमी प्रयत्नशीलच असतात असे नाही, तर ते सर्वधर्म समभाव जपत गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. हाच एकोपा मला विकास कार्य करण्यासाठी प्रेरणा देत असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र यादव महासभेचे विकास ठाकरेंना समर्थन
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना महाराष्ट्र यादव महासभेने समर्थन जाहीर केले. संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सतिश यादव यांनी दिलेल्या समर्थन पत्रात त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र यादव महासभेच्या (रजि.) आयोजित बैठकीत सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ठराव मंजूर केला. यात आगामी निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांच्या हितार्थ नागपूर जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र यादव महासभेने घेतला आहे. यादव समाज बंधू कडून मतदान करण्याचे आवाहनही सतिश यादव यांनी केले आहे.
जन-आशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेची सुरुवात मंगळवारी छावनी येथील दुर्गा माता मंदीर परिसरातून करण्यात आली. सकाळी आठ वाजता मातेचे दर्शन व पूजन करून जन-आशीर्वाद यात्रेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. यानंतर जन-आशिर्वाद यात्रा पुढे टेलर लाईन, विजय नगर, राज नगर, नेल्सन चौक, बैरामजी टाऊन, गोंडवाना चौक, मानकापूर, कल्पना टॉकिज आंबेडकर नगर, नागसेन सोसायटी, शिवाजी कॉम्पलेक्स, किराड लेआऊट, बडी मस्जिद, कुलर कंपनी, ताज नगर, गरीब नवाज मस्जिद रिंग रोड, श्रीनगर ढोरे लेआउट, सादिकाबाद, जयहिंद नगर छिंदवाडा रोड, संपता चौक, जुना मानकापूर, लुंबिनी नगर, वाठ लेआऊट आणि लुंबिनी नगर बुद्ध विहार येथे यात्रेचा समरोप झाले. यावेळी पश्चिम क्षेत्रातील महिला, पुरुष, तरुण विकास ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी रस्त्यावर दिसून आले. महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. तर सायंकाळी पाचच्या दरम्यान जन-आशीर्वाद यात्रेच्या दुसरा टप्पा धरमपेठ येथील आंबेडकर नगर बुद्ध विहारातून सुरुवात करण्यात आली. यावेळी विकास ठाकरे यांनी विहारात जाऊन तथागत बुद्ध आणि परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून त्यांना अभिवादन केले.
जन आशिर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांनी जाहिर केलेल्या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले.भव्य असलेली रैली पुढे हनुमान मंदीर टांगा स्टँड, झेंडा चौक, मामा रोड, अग्रवाल बिछायत केंद्र, मामा गजघाटे पॉईंट, वसंतराव नाईक झोपडपट्टी, गवळीपुरा आणि छोटा गवळीपुरा येथे यात्रेचे समापन झाले. नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादातून त्यांनी ठाकरे यांना प्रचंड मताधिक्याने दुसऱ्यांदा विधानसभेत पाठविण्याचा संकल्प केल्याचे मंगळवारी दाखवून दिले. जन-आशीर्वाद यात्रेत महाविकास आघाडीमधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी स्वंयफूर्तीने यात्रेचे जागोजागी जल्लोषात स्वागत करुन विकास ठाकरेंना विजयाचा आशिर्वाद दिला.