नागपुर समाचार : जात-पात, धर्म, वर्ग यांचा विचार न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे. भाजपाचे सर्व उमेदवार जनतेच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरतील व जीवनात सुधारणा घडवून आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करताना मतदाराचे एक मत नागपूर शहराच्या विकासाचे बळ ठरणार असल्याचे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी नागपूर शहरातील पूर्व, द्क्षीण, दक्षीण-पश्चिम, पश्चिम व मध्य विधानसभा क्षेत्रात प्रचार केला. बाईक रॅली, रोड शो, बैठका तसेच मतदारांच्या घरोघरी पोहचून संवाद साधला. भाजपाचे केंद्रातील आणि राज्यातील भाजपा-महायुती सरकारने आणलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. भाजपा-महायुतीचे सरकार आल्याने नागपूर शहरात विकासकामांच्या नवनवीन योजना राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. ते म्हणाले, नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आपल्या दारात आलो आहे. आपल्याशी थेट संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे, कारण आपला आशीर्वाद, आपले मत हेच आमच्या पुढच्या विकासाचा पाया आहे.
मागील काही वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. महिला, युवक, वृद्ध, शेतकरी, कामगार या सर्वांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. आपल्या मतांच्या पाठबळावर पुन्हा भाजपच्या उमेदवारांना विजयी केल्यास या योजना अधिक सक्षमपणे राबविण्यास आम्हाला संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उमेदवार कृष्णा खोपडे, मोहन मते, सुधाकर कोहळे, प्रवीण दटके, भाजपा शहराध्यक्ष बंटी कुकडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, निलिमा बावने, शेषराव सेलोकर, रामभाऊ वाकुलकर, बाल्या बोरकर, संतोष लढ्ढा, गुड्डू पांडे, श्रीकांत साहारे, महेंद्र राऊत, प्रमोद पेंडके, सुधीर दुबे, योगेश दांडेकर, राजू गोतमारे, सुनील सूर्यवंशी, संदीप शाहू, विजय हजारे, सचिन कराले, गिरीश पिल्ले, सचिन अवचट, सचिन चंदनखेडे, हितेश जोशी, अनिल राजगिरे, संजय महाजन, ज्योती भिसिकर, मनोज चापले, कांता सरोजकर, मनीषा धावडे, सुनीता चकोले, मनीष खोटे, राजू बुरे, हरीश विपिनवार, राजेश ढोके, रेखा सकोडे, राजेश धोंडेकर माधुरी पालीवाल, श्रीकांत शिवणकर, अरविंद भाजीपाले, अक्षय जगताप, प्रफुल महाकाळकर, मेहबूब पठाण, मुमताज बेगम, झाकीर अली, अजय राऊत, जगदीश पंचबुधे, सुधीर पाटणकर, विकास कापसे, संयोग पालीवाल, असिफ खान, अब्दुल कलाम, अक्षय वाकोडे, निसार अली, जयश्री मडावी, शुभम काजोने, सचिन पाचकवडे, विवेक गटलेवार, गणेश मंथापुरकर, पिंटू माचट्टीवार, कामठी येथील संजय गटलेवार, नरेंद्र कायरवार, सचिन बुर्रेवार, दिनेश तालेवार, सरोज तालेवार, गीता मंथनवार, चंद्रमोहन . माचट्टीवार, संजय पार पल्लीवार, तिरुपती माचट्टीवार, अजय माचट्टीवार, राजेश करणेवार, मुकेश माचट्टीवार, प्रिन्स डोकुलवार, विशाल मानकापूरवार, गणेश डोकुलवार, शेखर मंथापूरवार, सत्यनारायण डोकुनवार, दीपक इंगळे , दिनेश चौधरी, उत्तमराव बारई, उपस्थित होते.