- Breaking News, नागपुर समाचार, विधानसभा चुनाव

नागपूर समाचार : गडकरींच्या झंझावाताने महायुतीला बळ; नितीन गडकरीनी अख्खा महाराष्ट्र घातला पालथा

नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या 13 दिवसांमध्ये महाराष्ट्रभरात फिरून महायुतीच्या उमेदवारांना बळ दिले. 18 तारखेला म्हणजे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी होणाऱ्या चार सभांसह त्यांच्या एकूण जाहीरसभा तसेच रोड शोजची संख्या 72 होईल.

गेल्या दोन आठवड्यांपासून अख्खा महाराष्ट्र ना. गडकरी यांच्या सभांचा झंझावात आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद अनुभवत आहे. महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी ना. गडकरी यांनी दररोज सरासरी सात सभांना संबोधित केले. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई असा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र ना.गडकरी यांनी पालथा घातला.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी ना. नितीन गडकरी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांचा प्रचारदौरा होणार हे आधीच निश्चित होते. त्यानुसार ४ नोव्हेंबरला नागपूरमधून त्यांच्या सभांना सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दक्षिण, पूर्व आणि मध्य नागपुरात त्यांच्या सभा झाल्या. त्यानंतर ७ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी नॉन स्टॉप जाहीरसभा घेतल्या. गडचिरोली ते मुंबई अख्खा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला.

दि. ९ नोव्हेंबरला तर कारंजा-घाडगे, पुलगाव, समुद्रपूर, वर्धा, हिंगणघाट आणि हिंगणा (बुटीबोरी) अशा सहा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी त्यांनी सभा घेतल्या. दि. १५ नोव्हेंबरला एकाच दिवशी आठ मतदारसंघांमध्ये सभा घेऊन त्यांनी सर्वांना थक्क केले. या दिवशी आष्टी, कुरखेडा, नागभीड, उमरेड, कामठी, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर व पूर्व नागपूर अशा आठ मतदारसंघांमध्ये त्यांनी सभा घेतल्या.

ना. गडकरी यांच्या अमोघ वक्तृत्वामुळे सर्व ठिकाणी त्यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महायुतीला त्यांच्या प्रचारामुळे मोठे बळ मिळाले आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला ना. गडकरी यांच्या प्रचारसभांचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अखेरच्या दिवशीही चार सभा

दि. १८ नोव्हेंबरला (सोमवार) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबणार आहे. अखेरच्या दिवशी देखील ना. गडकरी यांच्या चार सभा होणार आहेत. यातील दोन सभा गोंदियातील सडक अर्जुनी व तिरोडा येथे तर प्रत्येकी एक सभा आणि कामठीत एक व मध्य नागपुरातील गोळीबार चौकात एक अशा चार सभा होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *