- Breaking News, विधानसभा चुनाव

कोराडी समाचार : कामठी-मौद्याच्या विकासासाठी बावनकुळेंना मिळाला जन-आशीर्वाद

महादुला-कोराडी येथे बाईक रॅलीत नागरिकांचा उत्साह

कोराडी समाचार : कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचा विकासााचा आराखडा समोर ठेवून सातत्याने धोरणात्मक कामे केली आहे. शांतता, सौहार्द, विकसित हा कामठी – मौदा विधानसभा मतदार संघाचा अजेंडा आहे. त्याला पुढे नेण्याचे काम यापुढेही सुरू ठेवणार असल्याचा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष तसेच कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुती उमेदवार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. कोराडी-महादुला येथे काढण्यात आलेल्या जन-आशीर्वाद यात्रेतून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

रविवारी (ता. १७ नोव्हें) कोराडी-महादुला येथे बाईक रॅलीतून कामठी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी बावनकुळे हेच एकमेव पर्याय असल्याचे मतदारांनी आवर्जून सांगितले. जन-आशीर्वाद यात्रेदरम्यान एका छोटेखानी सभेत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पुन्हा एकदा महायुती राज्यात सत्तेच्या दिशेने पाऊल ठेवत आहे. आगामी काळात कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचा नावलौकिक करण्याचा प्रयत्न कायम ठेवणार आहे. प्रत्येक नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी दिला. यात्रेत महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी, मनोज सावजी, नसीम शेख, प्रीतम लोहसारवा, राम तोडवाल, स्वप्नील थोटे, बंटी तातोडे, विजय जैन, पवन फकिर्डे, सोनू काळे, अंकित समरीत, पंकज ढोणे, विश्वनाथ चौहान, बापूराव सोनोने, अजय सोलंकी, अनिल बोरकर, शिवराज जनबंधू, गोपाल गोडबोले, अंकित तुरत, अभिजित ढेंगरे, अनिल उमरे, लल्ला खान, बाबू सनसेरा, अयाज शेख, हर्षल हिंगणेकर, हनुमंत लस्करे, सोनू काळे, धनंजय भालेराव, नरेंद्र झोड, राजेश बारमाटे, दिलीप वाघमारे, चिकू बारमाटे, हर्ष बारमाटे, पियूष बारमाटे, नितीन अतकरे, शुभम आवरकर, भजन भिमटे, मनोहर मांडवकर, सुधीर शेंडे, सौरभ शेंडे, दिशांत मांडवकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा-महायुती पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

नागरिकांचा स्वंयस्फूर्त सहभाग

महादुला येथील बाजार चौकातून सुरू झालेल्या जन-आशीर्वाद यात्रेत महायुतीमधील सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. श्री बावनकुळे यांचे जल्लोषात स्वागत करून जन-आशीर्वाद यात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा भारत माता चौक कोराडी, कोराडी मंदिर, टी पॉइंट कोराडी, नूर नगर, हनुमान मंदिर श्रीवास नगर, गहरी मोहल्ला, मोटघरे किराणा, गोडबोले चौक, फुले नगर, इंदिरा प्रगती नगर, फुले नगर जिल्हा परिषद शाळा, सिद्धार्थ नगर बुद्ध विहार, जयभीम नगर, संभाजी नगर, शिवाजी नगर, जवाहर नगर, धनगौरी मंदिर महादुला या मार्गाने यात्रा भ्रमण करीत मुख्य कार्यालयात पोहचली. नागरिकांनी जागोजागी श्री बावनकुळे यांचे फुलांच्या माळा आणि पुष्पवर्षाव करून स्वागत केले. महिलांनी औक्षण करीत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *