- Breaking News, नागपुर समाचार, विधानसभा चुनाव

नागपुर समाचार : विधानसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण; मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

विधानसभा मतमोजणीसाठी काही ठिकाणी 17 तर काही ठिकाणी होणार 30 फेऱ्या

नागपूर समाचार : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मतमोजणी केंद्रावरील टेबल व्यवस्था व सुरक्षिततेचा आढावा घेतला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार असून सुरक्षितेच्या बाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.

अशी आहे मतमोजणी केंद्रातील व्यवस्था

काटोल : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी (इवीएमसाठी) 20 टेबल असून तर पोस्टलसाठी 8 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 17 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 110 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

सावनेर : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी (इवीएमसाठी) 14 टेबल असून तर पोस्टलसाठी 6 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 27 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 94 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

हिंगणा : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी (इवीएमसाठी) 20 टेबल असून तर पोस्टलसाठी 6 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 24 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 120 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

उमरेड : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी (इवीएमसाठी) 20 टेबल असून तर पोस्टलसाठी 6 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 250 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

नागपूर दक्षिण-पश्चिम : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी (इवीएमसाठी) 14 टेबल असून तर पोस्टलसाठी 10 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 27 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 250 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

नागपूर दक्षिण : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी (इवीएमसाठी) 14 टेबल असून तर पोस्टलसाठी 8 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 25 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 170 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

नागपूर पूर्व : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी (इवीएमसाठी) 14 टेबल असून तर पोस्टलसाठी 8 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 27 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 200 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

नागपूर मध्य : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी (इवीएमसाठी) 14 टेबल असून तर पोस्टलसाठी 8 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 22 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 150 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

नागपूर पश्चिम : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून तर पोस्टलसाठी 8 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 280 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

नागपूर उत्तर : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून तर पोस्टलसाठी 8 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 30 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 150 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

कामठी : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी (इवीएमसाठी) 20 टेबल असून तर पोस्टलसाठी 8 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 27 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 150 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

रामटेक : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी (इवीएमसाठी) 26 टेबल असून तर पोस्टलसाठी 6 टेबल राहतील. मतमोजणीच्या एकूण 18 फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी सुमारे 200 अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष काम पाहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *