- Breaking News, Chif Reporter - Wasudeo Potbhare, नागपुर समाचार, शीत सत्र २०२४

नागपूर समाचार : हिवाळी अधिवेशनासाठी आवश्यक सुविधा- व्यवस्था पूर्ण करा – विजयलक्ष्मी बिदरी यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

स्वच्छतेकडे विशेष लक्ष; आहारांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून होणार 

नागपूर समाचार : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवन, रवीभवन, आमदार निवास, हैद्राबाद हाऊस येथील आवश्यक सुविधांची कामे येत्या आठ दिवसात प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सुचना विभागीय आयुक्त् विजलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी विपीन सहआयुक्त राजलक्ष्मी शहा, पुरवठा विभागाचे सहआयुक्त अनिल बन्सोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित कृचेवार तसेच महसूल, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

निवास व्यवस्थेत आवश्यक सुधारणा

रामगिरी, देवगिरी, विजयगड तसेच रवीभवन, नागभवन, आमदार निवास येथील संपूर्ण व्यवस्था सार्वर्जानक विभागाने प्राधान्याने पूर्ण करावी. तसेच मागील वर्षाप्रमाणे निवास व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करुन येत्या आठवड्यात संपूर्ण व्यवस्थेची व सुविधांची वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत तपासणी करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. हिवाळी अधिवेशनाकरिता विविध परिसरातील शासकीय इमारती निवास तसेच मंत्रालयीन कार्यालयातील कर्मचारी निवास स्थान आदींची किरकोळ दुरुस्ती व स्वच्छता प्राधान्याने पूर्ण करावी. या विद्युत पुरवठा, अग्निशामन व्यवस्था, सीसीटिव्ही कॅमेरे, दूरध्वनी व्यवस्था आदींना प्राधान्यक्रमाने पूर्ण करावेत.

तत्पर वैद्यकीय सुविधा

आमदार निवास, रवीभवन, विधानभवन आदी परिसरात अल्पोपहार व भोजनाची सुविधा करण्यात येते. आहार संबंधीची दैनंदिन तपासणी अन्न व औषध विभागाकडून नियमितपणे करावी. यासाठी स्वतंत्र अधिकार्‍यांच्या नियुक्तया कराव्यात. अधिवेशनासाठी येणार्‍या लोकप्रतिनिधी, अधिकारी आदीसाठी वैद्यकीय सुविधा तसेच इर्मजन्सीमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून शासकीय व खाजगी रुग्णालय बेड आरक्षित करावेत, असे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी दिले. अधिवेशनासाठी आवश्यक साहित्य, संगणक, फर्निचर व मनुष्यबळ आदींचे नियोजन करावेत. 

अधिवेशन दरम्यान मोर्च, धरणे, आंदोलन, साखळी उपोषण स्थळावर पोलीस विभागाच्या सहकार्याने संबंधीत विभागाने पूर्णपणे लक्ष द्यावे. यावेळी निवास व्यवस्था करतांना महिला व विभागाने हिरकणी कक्ष सज्ज ठेवावा. मंत्रालयीन कामकाज ई-ऑफिसवर करण्याच्या दृष्टिने आवश्यक सूविधा उपलब्ध करावेत. त्यासोबतच व्यवस्थेसंबंधीत सूपर्ण माहिती अ‍ॅपवर उपलब्ध करुन द्यावीत.

एक हजार वाहनांची आवश्यकता

अधिवेशन काळात असणार्‍या वाहनांची व्यवस्था राज्यातील सर्व महसूल विभागातून आलेल्या वाहनांद्वारेच करण्यात येणार आहे. यासाठी १ हजार पेक्षा जास्त वाहनांची आवश्यकता असल्यामुळे सुस्थितीतील उपलब्ध होतील. परिवहन विभागाकडून या वाहनांची तपासणी करण्यात यावी, अशी सूचनाही यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *