नागपूर समाचार : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नागपुरातील पहिल्या ‘ग्लोबल इंडियन स्टार्स’ या संगीतमय प्रतिभा शोध स्पर्धेची अंतिम शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. जीआयआयएस, लावा, नागपूर च्या प्रांगणात सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरवात होणार असून प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शेखर रावजियानी मुख्य परीक्षक राहतील.
या स्पर्धेसाठी १५०० हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यातून उत्कृष्ट 100 स्पर्धकांची दुस-या फेरीसाठी प्रतिष्ठित ज्युरी समितीद्वारे निवडल्या गेल्या होत्या. अंतिम फेरीमध्ये गायन व वाद्य वादन अशा दोन गटात एकुण 20 तरुण स्पर्धक राहणार आहे. या स्पर्धकांना रावजियानी यांच्यासमोर आपला कला प्रस्तुत करण्याची संधी मिळणार आहे.
रावजियानी केवळ विजेत्यांचीच निवड करणार नाहीत तर त्यांना मार्गदर्शनही करतील. या कार्यक्रमात विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी – कृपया संपर्क साधावा – आभिका हरी (८४३९८४१७२४)