नागपूर समाचार : नागपुरातील वर्धमान नगर चौकात शनिवारी सकाळी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण धडकेत एक ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला, तर दुसरा घटनास्थळावरून फरार झाला. जखमी चालकाला स्थानिक लोकांनी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. पहाटेची वेळ असल्याने जखमी चालक बराच वेळ रस्त्यावर पडून होता. लोकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर लकडगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. धडक दिल्यानंतर लगेचच आरोपी चालक ट्रकसह पळून गेला. त्याचवेळी अपघातग्रस्त ट्रक पीओपी बॅगने भरला होता. पोलिसांनी आरोपी चालकाचा शोध सुरू केला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.