- Breaking News, विदर्भ, स्वास्थ 

हिंगणघाट समाचार : अन्नातून विषबाधा झालेल्या विध्यार्थ्यांना व कुटुंबीयांना आ. समीर कुणावार यांनी दिला धीर..

वाघोली जिल्हा परिषद शाळेतील घटना; एकूण ४५ विद्यार्थ्यांना झाली विषबाधा

हिंगणघाट समाचार : तालुक्यातील वाघोली येथे जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा दुदैवी प्रकार काल मंगळवारी उघडकिस आला. या दुदैवी घटनेची आ. समिर कुणावार यांनी विशेष दखल घेत आरोग्य विभाग व शिक्षण विभागाला तातडीची मदत देऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

आज दिनांक ११-१२-२०२४ रोजी आमदार समिर कुणावार यांनी सर्व संबंधीत अधिकाऱ्यांसह स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान, DHO डॉक्टर नाईक सर , हिंगणघाट पंचायत समिती विस्तार अधिकारी, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय च्या अधीक्षक डॉक्टर मिसार मॅडम, डॉक्टर राहुलजी भोयर, माननीय अपूर्व पीरके, डॉक्टर कांबळे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकिय अधिक्षिका डॉ. गुजर इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

काल दि.१० रोजी वाघोली येथील प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी हा शालेय पोषण आहार देण्यात आला, त्यानंतर मुलांना उलटी, मळमळ व ताप यासारखी लक्षणे आढळून आली. वाघोली येथील शालेय कर्मचाऱ्यांनी बाधीत विध्यार्थ्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

येथे तब्बल ४५ विद्यार्थी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल मंगळवारी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, त्यातील ०४ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली. तर ४१ विद्यार्थ्यांवर अजणूनही उपचार केले जात असल्याची माहिती आहे. नेमकी विषबाधा ही शालेय पोषण आहारातून झाली की आणखी कशामुळे झाली याबाबत आरोग्य विभागाचा अहवाल अंतीम ठरणार आहे. अद्यापही शाळा व्यवस्थापनाने देखील विषबाधेचे कारण स्पष्ट केलेले नाही.विद्यार्थ्यांनी खाललेल्या अन्नपदार्थांची चाचणी केल्यानंतरच विषबाधेचे कारण स्पष्ट होणार आहे. 

पाहणी करतेवेळी भाजपा पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते हिंगणघाट नगरपालिकेचे माजी नगरसेवक देवा पडोळे, अतुल नंदागवळी, प्रमोद नौकरकर, कमलाकर महाकाळकर, नितीनजी वाघ इत्यादी कार्यकर्ता मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *